भुतमुगळी ग्रामपंचायतीला लातूर जिल्हा परिषदेचा सन्मान

भुतमुगळी ग्रामपंचायतीला लातूर  जिल्हा परिषदेचा सन्मान


औसा (प्रतिनीधी)-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य स्वराज्य उपक्रमा अंतर्गत निलंगा पंचायत समिती व जि प लातूर यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले.9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत भुतमुगळी ग्रामपंचायतने चांगले उपक्रम राबवले याची दखल बिडीओ अमोलजी ताकभाते साहेबांनी घेतली . निलंगा तालूक्यातून उत्कृष्ठ ग्रामपंचायत म्हणून जि. प.  लातूरकडून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव उपकार्यकारी अधिकारी गिरी, काळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, शिक्षणाधिकारी ( प्रा ) वंदना फुटाने मॅडम उपस्थित होत्या . हा सन्मान उपसरपंच सतिष च०हाण , हरिभाऊ सावंत , ग्रामसेवक , भास्कर सोळुंके , गुंडुरे सर, अजय मोरे सर यांनी स्विकारला.मधुकर गायकवाड सरपंच, रामकिशन सावंत चेअरमन व सर्व गावकऱ्यांनी अभिनंदन केले . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने