पोळा सण लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये उत्साहात साजरा

लातूर/प्रतिनिधी:मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लातूर येथील लॉर्ड श्रीकृष्ण् इंग्लिश स्कुल मध्ये विद्यार्थ्यांनी बैल पोळा सण उत्साहात साजरा केला.या प्रसंगी बैलांची पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्या दुर्गा भताने,समन्वयक रौफ शेख यांच्या हस्ते बैलांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली.विद्यार्थ्यांना  भारतीय संस्कृतीतील सणांची ओळख व्हावी या दृष्टीने लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये आज बैल पोळा सण साजरा केला. शाळेच्या शिक्षिका दिपाली स्वामी यांनी बैल पोळा सणा विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक पोळा सण साजरा करतात. या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते.महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.शाळेतील विद्यार्थी शिवम जाधव, ओवी शिरसाठ, आरोही वाघमारे, अनुष्का सगर, प्रद्युम्न स्वामी व रुद्रमानी पाटील यांनी बैल पोळा या सणा विषयी आपले विचार विद्यार्थ्यासमोर मांडले. तसेच आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते शाळेतील विद्यार्थ्यांनी मातीपासून तयार केलेले अति सुंदर सजावटीतील बैल.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका नम्रता झांबरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

           


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने