किनीथोट नाही किनीथोर म्हणा- संतोष सोमवंशी

                                      किनीथोट नाही किनीथोर म्हणा- संतोष सोमवंशी





औसा- तालुक्यातील किनीथोट येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे उदघाटन महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप, लोकांना फकीरा कादंबरी वाटप तसेच गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किनीथोट गावाच्या नाव बदलायचा प्रस्ताव मंजूरी साठी शासनाकडे दाखल करून मंजूर करू पण आजपासूनच किनीथोट नाही तर किनीथोर म्हणायचे असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती कांबळे होते तर प्रमुख पाहूणे महाराष्ट्र युवा संघटनेचे अध्यक्ष सुनील सौदागर , युवा सेना उपजिल्हा प्रमुख दिनेश जावळे , बळी कांबळे , अमर शिंदे होते . सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती समिती अध्यक्ष नेताजी कांबळे , विजय भुजबळ, योगीराज काळे , मधुकर भुजबळ, अर्जुन पाटिल , सुभाष कांबळे,  गंगाधर कांबळे, किशोर बुरांडे, तानाजी कांबळे, विश्वजित कांबळे, पोलीस संजय कांबळे, युवराज कांबळे आदीने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव बुरांडे तर आभार स्वामी सर यांनी मांडले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने