मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमीत्य द लातूर संस्कृतीच्यावतीने भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन

 मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमीत्य द लातूर संस्कृतीच्यावतीने भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन




  लातूर -मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु होत असून या निमीत्ताने द लातूर संस्कृती फाऊंडेशनच्यावतीने जिल्हा व राज्यस्तरावर भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु आहे व सर्वत्र विविध कार्यक्रमाने हे वर्ष साजरे करण्यात येत आहे. परंतू मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाला. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठा आहे. यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे या उद्देशाने द लातूर संस्कृती फाऊंडेशनच्यावतीने राज्यस्तरावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. शालेयस्तरावरील निबंधाचा विषय मराठवाडा मुक्तीसंग्राम असा आहे तर महाविद्यालयीन गटासाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील लातूर जिल्ह्याचे योगदान तर खुल्या गटासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम हा विषय ठेवण्यात आलेला आहे. राज्यस्तरावर घेतल्या  जाणा-या या निबंध स्पर्धेसाठी शालेयस्तरावरील गटासाठी प्रथम रोख रक्कम २१००, द्वितीय १५०० रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह. महाविद्यालयीन गटासाठी प्रथम रोख रक्कम ३१००, द्वितीय २१०० रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह. खुल्या गटासाठीप्रथम रोख रक्कम २१००, द्वितीय १५०० रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह.स्पर्धकांनी आपला स्वहस्ताक्षरामध्ये लिहिलेला निबंध आपल्या विनंतीअर्जासह एका बंद लिफाफ्यामध्ये स्पर्धा संयोजक द लातूर संस्कृती फाऊंडेशन कार्यालय द्वारा हाथवे एमसीएन केबल नेटवर्वâ पहिला महिला, आयसीआयसीआय बँक, औसा रोड लातूर. पिनकोड ४१३५१२ येथे  तसेच दैनिक सामना कार्यालय, महानगर पालिका शॉपींग कॉम्पलेक्स, गांधी चौक लातूर पिन कोड. ४१३५१२ येथे दिनांक १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रत्यक्ष विंâवा पोष्ट अथवा कुरिअरद्वारे पाठवावेत. उशीरा येणाNया प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. तरी या स्पर्धेमध्ये ज्यास्तीत ज्यास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असे अवाहन सुपर्ण जगताप, दिपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, प्रा.डॉ.सितम सोनवणे, अ‍ॅड. राहूल मातोळकर, काशिनाथअप्पा बळवंते, डॉ. दत्तात्रय दगडगावे, अ‍ॅड. गोपाळ बुरबुरे, डॉ.बी.आर.पाटील, शिवशंकर चापुले, ऋषीकेश दरेकर, प्रा.डॉ. मनिषा धोत्रे, प्रा.शिल्प सुरवसे यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने