सेवाकार्य करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते औसा शिक्षक पतसंस्थेचे
ध्वजारोहण ठेवून स्वातंत्राचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
औसा - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ निमित्त औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शिक्षक भवन या भव्य इमारतीवर व कार्यालयात, परिसरात तिरंगा रंगाच्या फुग्यांनी सजावट करून सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्य, राष्ट्रीय कार्य व शैक्षणिक बांधिलकी म्हणून सेवाकार्य करणाऱ्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर यांच्या हस्ते पतसंस्थेचे दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवात दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवानंद नामदेव गवळी यांच्या हस्ते तर दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त प्राथमिक पदवीधर वसंत बाजीराव सर्जे यांच्या हस्ते आणि भारतीय स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कमलाकर रामराव सावंत यांच्या हस्ते पतसंस्थेचे ध्वजारोहण करण्यात आले. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कमलाकर रामराव सावंत यांनी दिनांक ०३/०१/१९८४ रोजी जि.प. प्रशाला जवळगा ता. उदगीर येथून सहशिक्षक पदावरून शैक्षणिक सेवेला सुरुवात करून केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थाना पाठ्य पुस्तका बरोबर सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्य करण्याचे शिक्षण देत ज्ञानदीप उपक्रम व कृषी विज्ञान प्रदर्शन राबवून केंद्रातील १२ पैकी १० शाळाना आय.एस.ओ. मिळवून दिले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना तालुका, जिल्हा, मराठवाडास्तरीय आदर्श पुरस्कार मिळाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर यशदा पुणे च्या विविध प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन, आर्थिक वृद्धी सल्लागार, अंध अपंग व बेरोजगार यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करीत आहेत.
सेवानिवृत्त प्राथमिक पदवीधर वसंत बाजीराव सर्जे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवानंद नामदेव गवळी यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थाना पाठ्य पुस्तका बरोबर सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्य करण्याचे शिक्षण देत शिष्यवृत्तीचे जादा तास घेवून विशेष प्रविण्यात विद्यार्थी घडवून डी.पी.ई.पी., वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन यामध्ये सक्रीय सहभाग घेवून बाला उपक्रमात १००% गुण शाळेला मिळवून दिले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना तालुकास्तरीय आदर्श पुरस्कार मिळाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर ही आठवड्यातून ३ दिवस शाळेत पुर्ण वेळ हजर राहून अध्यापन कार्य करीत आहेत. अशा सेवानिवृत्तीनंतर सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्य करणाऱ्या केंद्रप्रमुख, प्राथमिक पदवीधर, शिक्षक यांच्या हस्ते पतसंस्थेचे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे कर्मचारी मल्हारी कांबळे, शिरीष पवार, विनय आयतनबोने यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा