केशवराज विद्यालयाचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

                केशवराज विद्यालयाचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र




 लातूर /प्रतिनिधी:जून महिन्यात घेण्यात आलेल्या NMMS या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेत श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.विद्यालयातील एकूण ४७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ११ विद्यार्थी  शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS परीक्षा) ही महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते.या परीक्षेत केशवराज विद्यालयातून ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक प्रदीप कटके व NMMS विभाग प्रमुख त्रिंबक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशवंत विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख व संजय गुरव तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,केशवराज शैक्षणिक संकुलातील सर्व संस्था पदाधिकारी,केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक व सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने