पैगंबरविषयी अपशब्द काढून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आ.टी राजा विरोधात कारवाई करा -मुस्लिम समाज बांधवांची मागणी

 पैगंबरविषयी अपशब्द काढून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आ.टी राजा

 विरोधात कारवाई करा -मुस्लिम समाज बांधवांची मागणी 

औसा / प्रतिनिधी :- तेलंगणाचे भाजपाचे आमदार यांनी पैगंबर (स) याच्याविषयी अपशब्द काढून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करून , प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या बद्दल अपशब्द वापरून समस्त मुस्लिम समाजाच्या भावनाला ठेस पोहोचविण्याचे काम केले आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर तेलंगणा सरकारचे आमदार टी राजा याच्यावर कडक कार्यवाही करून शिक्षेची तरतूद करण्यात यावी, या मागणी संदर्भात समस्त शहर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने दंडावर काळ्या रंगाच्या फिती लावून निषेधार्थ औसा तहसीलदार मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
तेलंगाणा राज्याचे भाजपाचे आमदार टी राजा  त्याच्यावर गुन्हा दाखल करा, कडक शिक्षा करावी. अपशब्द वापरणाऱ्या महान पुरुषांबद्दल बोलणाऱ्यांवर  भारत सरकारने एक कायदा करावा जेणेकरून असे समाज विघातक कृत्य पुन्हा पुन्हा होणार नाहीत. तसेच गुजरात मध्ये २००२ मध्ये पठाण, बिलकीस बानो यावर अकरा नराधमांनी केलेला बलात्कार व अन्याय संदर्भात त्यांना जन्मठेप शिक्षा झालेली होती, परंतु त्यांना या १५ ऑगस्ट अमृत महोत्सव रोजी सोडून देण्यात आले. जे न्यायाच्या विरुद्ध आहे. तरी या नराधम गुन्हेगारांना परत अटक करून त्यांना देण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करण्यात यावी. अशी मागणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, शेख शकील, सय्यद मुजफ्फर अली इनामदार, सय्यद अजहरुल्ला हाश्मी, समीर शेख, सामाजिक कार्यकर्ता शेख खाजा, गोविंद पवार, अँड शाहनवाज पटेल, अँड एफ एस पटेल, सरफराज पटेल, अँड सय्यद मुस्तफा, ईलहाज पटेल, मुजमील शेख, जाकेर शेख, अँड युसुफ शेख, सत्तार शेख, सय्यद अल्ताफ, अरशद कुरेशी, शेख इमाम शौकत, शेख मोहसीन शेख सहेराब, खदीर शेख, जावेद मुजावर, सचिन माळी, अलीम शेख, इजाज, कृष्णा सावळकर, ॲड. शिवाजी सावंत, शेख मोईनोद्दीन आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने