'महात्मा बसवेश्वर'मध्ये जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न


लातूर-  येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (अमृत महोत्सव समिती व संगीत आणि सांस्कृतिक विभाग), लातूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लातूर जिल्हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, उपकेंद्र, लातूर येथील संचालक डॉ.राजेश शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा.माधवराव पाटील टाकळीकर हे होते तर विचारमंच्यावर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ.रमाकांत घाडगे, जिल्हा समिती अध्यक्ष डॉ.राजेंद्र अवस्थी, स्पर्धाप्रमुख डॉ.संदीपान जगदाळे, प्रा.गोविंद घार, सिनेट सदस्य डॉ.दीपक चाटे, डॉ.संतराम मुंढे, डॉ.रमेश धनेश्वर, डॉ.अंजली जोशी, डॉ.केशव अनगुले, डॉ.भास्कर रेड्डी, परीक्षक सुरमणी भुजंग मुर्के, डॉ.दीपाली पांडे आणि डॉ.परांडे, प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, समन्वयक डॉ.श्रीकांत गायकवाड आणि समन्वयक डॉ.बाळासाहेब गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे म्हणाले की, मानवी जिवनामध्ये संगीताला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या महाविद्यालयात प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी आणि प्रा.गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभाग नेत्रदीपक प्रगती साध्य करीत आहे तसेच मागील वर्षी आपल्याला विविध क्षेत्रामध्ये ०९ गोल्ड मेडल मिळाले आहे.उद्घाटकीय मार्गदर्शन करताना डॉ.राजेश शिंदे म्हणाले की, आपण यावर्षी आझादीका अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये सहभागी झालेल्या शहिदांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करीत आहोत.      
यावेळी डॉ.राजेंद्र अवस्थी यांनी आपण सर्व या स्पर्धेमध्ये मोठया संख्येने सहभागी झालात याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच प्रा.गोविंद घार, डॉ.रमाकांत घाडगे आणि डॉ.श्रीकांत गायकवाड आदिनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर डॉ.संदीपान जगदाळे यांनी स्पर्धेचे नियम व अटी सर्वाना सांगितल्या.यावेळी अध्यक्षिय समारोप करताना संस्थेचे सचिव मा.माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांच्या पावन विचारांची ही भूमी आहे. संगीत सर्वाना संस्कार देण्याचे महत्वाचे कार्य करते. आपन पदाधिकारी म्हणून काम न करता सेवक म्हणून कार्य केले पाहिजे असे सांगून आपली वैयक्तिक संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती मानले पाहिजे असेही ते म्हणाले.
या स्पर्धेमध्ये महात्मा बसवेश्वर वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय संघाला प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रुपये ३०००रु.चे पारितोषिक, तर दयानंद वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय संघाला द्वितीय  क्रमांकाचे प्रत्येकी रुपये २०००रु.चे पारितोषिक आणि राजर्षी शाहू वरिष्ठ महाविद्यालय संघाला तृतीय क्रमांकाचे रुपये १०००रु.चे पारितोषिक आणि सहभागी प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्या संघास विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हास्तरीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समिती सदस्य  डॉ.साईनाथ उमाटे, डॉ.विजेन्द्र चौधरी, डॉ.नारायण कांबळे, डॉ.नंदकुमार मगर, डॉ.बालाजी भुरे, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.बालिका कांबळे, डॉ.मनोज रेड्डी, डॉ.गौरव जेवळीकर, डॉ.किरण गुट्टे, डॉ.नामदेव येमेकर, डॉ.सुदर्शन पेडगे, डॉ.नारायण सूर्यवंशी, सांस्कृतिक विभागातील डॉ.दिनेश मौने, डॉ.यशवंत वळवी, डॉ.जितेंद्र देशमुख, डॉ.शीतल येरूळे, प्रा.शिवशरण हावळे, प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, डॉ.श्रद्धा अवस्थी, डॉ.उमा कडगे, प्रा.गीता गिरवलकर, प्रा.वैशाली जयशेट्टे, प्रा.गोविंद पवार आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालयीन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती सदस्य प्रोफेसर राजकुमार लखादिवे, डॉ.सदाशिव दंदे, डॉ.विजयकुमार सोनी, डॉ.मंतोष स्वामी, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.टी.घनश्याम, प्रा.आशिष क्षिरसागर, डॉ.राहुल डोंबे, प्रा.शंकर भोसले, प्रा.मारुती माळी, जलील सय्यद, शुभम बिराजदार, भीमाशंकर सुगरे यांनी सहकार्य केले.या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून सुरमणी भुजंग मुर्के, डॉ.दीपाली पांडे आणि डॉ.परांडे यांनी काम पहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धोंडीबा भुरे आणि डॉ.अश्विनी रोडे यांनी तर आभार डॉ.रत्नाकर बेडगे यांनी मानले.  
या कार्यक्रमाला लातूर जिल्हास्तरीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समितीतील सर्व पदाधिकारी, सांस्कृतिक विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने