प्रा.मालपाणी यांच्या पुस्तकाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकाशन

                 
            प्रा.मालपाणी यांच्या पुस्तकाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकाशन

    औसा: तालुक्यातील आलमला येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी  या महाविद्यालयातील प्रा. सुरज मालपाणी यांच्या द्वारा लिखित इससेन्शियल्स ऑफ मेडिसनल केमिस्ट्री-1 या पुस्तकाचे प्रकाशन माजी मंत्री, दिलीपराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, पुस्तकाचे लेखक डॉ. मालपानी एस.जी., सहलेखक बिराजदार एम.जी., गडगुळ .बी., देशमुख एस.यु. आणि डॉ. पंचभाई. व्ही.बी. इत्यादी उपस्थित होते.

                सदीरल पुस्तक हे विद्याथ्र्यांना निश्चितच उपयोगी ठरेल  विध्यार्थ्यांच्या  ज्ञानात अधिक भर पडेल असे मत दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले आणि सुरज मालपाणी यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आपल्या मनोगतात  प्रा. सुरज मालपाणी यांनी विद्यार्थीनी सदरील पुस्तकाचा यथोचित्त  वापर करून विषयात पारांगत व्हावे जेणेकरन पुढील अभ्यासक्रमास  उपयुक्त ठरेल  तसेच  माहिती संग्रहित करुन अभ्यासक्रमाशी संबंधित विध्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत पुस्तक प्रकाशित करण्याचा मानस पूर्ण केल्याचे समाधान असल्याचे सांगितले.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने