श्री केशवराज विद्यालयात दहीहंडी

 श्री केशवराज विद्यालयात दहीहंडी


  लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशवराज विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक सुनील वसमतकर,उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे,पर्यवेक्षक दिलीप चव्हाण,अंजली निर्मळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नरेश इरलापल्ले यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या बाललीलांची माहिती सांगितली.
राधा व कृष्णाची वेशभूषा करून अनेक विद्यार्थी शाळेत आले होते.इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी तीन थरांचा मनोरा करून दहीहंडी फोडली.आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वाद्य वाजवून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.कलोपासक मंडळा अंतर्गत झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन संगीता लोखंडे यांनी केले.
  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख माधव जोशी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांचे सहकार्य लाभले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने