ध्येय निश्चित असेल तर परिस्थितीवर मात करता येते- मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव

        ध्येय निश्चित असेल तर परिस्थितीवर मात करता येते- मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव


औसा-प्रतिनिधी-आपल्या जीवनात कसलीही परिस्थिती असेल तरीही ध्येय निश्चित असेल तर त्यावर मात नक्की करता येतं असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांनी बोलताना सांगितले.ग्रामीण भागातील विद्यार्त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळतं नसल्याचे ही ते बोलताना सांगत होते.आपल्या लहानपणींत शालेय जीवनातील कटू अनुभव त्यांनी मनोगतात झालेली पडझड बोलताना व्यक्त केली.त्यांना शालेय जीवनात अक्षरक्ष: ऑटोला पैसे नसताना ही 15 सप्टेंबर 1988 यावेळी दयानंद कॉलेज येथे पहिल्या दिलेल्या मुलाखतीचे कथन केले.आपल्या प्रॉपर मार्गदर्शन मिळतं नसल्याची खंत ही त्यांनी यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली.आपल्या प्राध्यापक ते CEO अशा झालेला संघर्षमय प्रवास सांगताना ते भावुक झाले होते.औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालय येथे रायसिना फाउंडेशन अंतर्गत गुणवंत विध्यार्थी सन्मान समारोह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजित सन्मान सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते.त्याचबरोबर श्री कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्रा.रुपचंद राठोड यांनी आपल्या आयुष्यातील शिक्षणाची होतं असलेल्या पडझड पाहता आजच्या तरुणाईला खुप मेहनत घेणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले.आजच्या या गुणवंत सोहळ्याचे प्रमुख विचार मांडणारे प्रा.अशोक राठोड यांनी आपल्या खास शैलीतून उपस्थित विध्यार्थी मित्रांना मोलाचे मार्गदर्शन केले.विध्यार्थी मित्रांना यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्यातील ठराविक जसे की,आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक,शारीरिक,मानसिक,बोद्धिक,आत्मविश्वास आदी विषयाची सखोल व नियोजन बद्ध प्रमाणे मांडणी मांडली तर तुम्ही नक्कीच आयुष्याची लढाई जिकणार यांत शंका नसल्याचे बोलताना ते सांगत होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे ad.CEO मा.प्रभू जाधव साहेब,प्रा.रुपचंद राठोड,उपप्रादेशिक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण अधिकारी संतोष चव्हाण,BDO आबासाहेब चव्हाण,डॉ.केशव राठोड,ऍड.नितीन राठोड,जिलाध्यक्ष बबलू जाधव,प्रसाद राठोड,बालाजी राठोड,गोर सेनेचे जिल्हासचिव दयानायक राठोड,ऍड.संतोष पवार,एकबीचे सरपंच शिवराज राठोड,औसा तालुकाध्यक्ष भीमा जाधव,श्रीकांत राठोड,पृथ्वी चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
  या विध्यार्थी गुणगौरव सन्मान सोहळा पार पाडण्यासाठी शिकवाडीचे महाराष्ट्र दल प्रमुख एल.टि.चव्हाण,गोरसिकवाडीचे संयोजक बळीराम जाधव,पृथ्वी चव्हाण,श्रीकांत चव्हाण आदीनी प्ररिश्रम घेतले. प्रथमतः आयोजित कार्यक्रमात संत सेवालाल महाराज,वसंतराव नाईक,काशिनाथ नायक यांच्या प्रतिमेस पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे यांचा यथोचीत सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गोरसिकवाडीचे संयोजक बळीराम जाधव गुरुजी,प्रास्ताविक बालाजी राठोड यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार शरद राठोड यांनी मांडले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने