पोहरेगाव ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

पोहरेगाव ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

   रेणापूर/प्रतिनिधी: तालुक्यातील पोहरेगाव येथील ग्रामपंचायतीला ISO  9001:2015 हे मानांकन प्राप्त झाले आहे.
  पोहरेगाव ही रेणापूर तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत आहे.गावाचा विस्तार आणि लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतीने नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.गावातील नागरिकांच्या विविध गरजा ओळखून त्यासाठी उपाययोजना करण्यात ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलेला घेतला आहे.लोकनियुक्त सरपंच गंगासिंह कदम यांच्या नेतृत्वात नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध प्रमाणपत्रे लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जात आहेत.गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासोबतच हरित करण्यासाठी गावात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.ग्रामपंचायती संदर्भातील सर्व सेवा सुविधा उत्कृष्टपणे उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायतीला हे मानांकन प्राप्त झाले आहे.गावातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच विविध सेवा सुविधा देता आल्या. त्यामुळे या मानांकनाचे श्रेय गावकऱ्यांचेच आहे,अशी प्रतिक्रिया सरपंच गंगासिंह कदम यांनी व्यक्त केली.

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने