माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या हस्ते माजी खा.जनार्धन वाघमारे यांचा सत्कार

            माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या हस्ते माजी खा.जनार्धन वाघमारे यांचा सत्कार



लातूर -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू तथा महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत माजी खा.डॉ.जनार्धन वाघमारे यांची सत्यशोधक समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तसेच कोल्हापूर येथून दिला जाणारा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्याबद्दल भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी त्यांच्या अंबाजोगाई रोड भागातील निवासस्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला.
यावेळी शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.सतीश यादव उपस्थित होते. सप्टेंबर 2022 मध्ये औरंगाबाद येथे होणार्‍या सत्यशोधक समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी कुलगुरू तथा माजी खा.डॉ.जे.एम.वाघमारे सर यांची निवड करण्यात आली. तसेच कोल्हापूर येथून दिला जाणारा छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार नुकताच त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या निवासस्थानी भेट देवून माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी व डॉ. सतीश यादव यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्‍लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने