ग्रीन लातूर वृक्ष टीम करतेय शहरातील दोन लाख झाडांचा सांभाळ

                              ग्रीन लातूर वृक्ष टीम करतेय शहरातील दोन लाख झाडांचा सांभाळ



लातूर/प्रतिनिधी:मागील ११८२ दिवसापासून लातूर जिल्हा व शहर परिसरात ग्रीन लातूर वृक्ष टीम वृक्ष लागवड व वृक्ष संगोपणाचे अविरतपणे कार्य करत आहे.या टीमच्या सदस्यांनी शहरात सर्वत्र नव्वद हजारापेक्षा जास्त लहान मोठी झाडे लावली आहेत. दुष्काळी, ओसाड, रुक्ष लातूर शहराला हरित बनविण्याचे कार्य ग्रीन लातूर वृक्ष टीमने केलेले आहे. या टीमने लावलेल्या झाडांपेक्षा शहरातील इतर झाडांचे ही संगोपणाचे कार्य या टीमच्या माध्यमातून होत आहे. झाडांना टँकरद्वारे पाणी देणे, झाडांच्या छाटणी करून त्यांना आकार देणे, गरजेनुसार झाडांना काठ्या लावणे, झाडांना आळे करणे, झाडांभोवती वाढलेले खुरटे गवत काढणे हे कार्य ग्रीन लातूर वृक्ष टीमचे ऐंशी सदस्य दैनंदिन स्वरूपात करत असतात. आज याच पद्धतीने कार्य करत प्रत्येक झाड महत्वाचे आहे असे समजून लावण्यात आलेलं प्रत्येक झाड जगविण्यासाठी-वाचविण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सदस्य नियमितपणे प्रयत्नशील असतात.जुना रेणापूर नाका ते बालाजी मंदिर रस्ता,बिर्ला स्कुल रस्ता,नवीन बसस्थानक परिसर,केशवराज शाळा परिसर,रियाझ कॉलनीकाशी विश्वेश्वर मंदिर परिसर,दिपज्योती नगर,शंभू कॉलनी,विशाल नगर,पद्मा नगर या भागात लावलेल्या झाडांचे संगोपन कार्य करण्यात आले.जिथे झाडे रुजवली जातात, जिथे झाडे जगवली जातात. हे ब्रीद वाक्य सोबत घेऊन निरंतर कार्य सुरू आहे.जास्तीतजास्त देशी व पर्यावरण पूरक, दुर्मीळ झाडे लावण्यावर भर देण्यात येत आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने