बलशाली भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे - अजितसिंह पाटील कव्हेकर

 बलशाली भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी समाजातील प्रत्येक

घटकाने योगदान द्यावे- अजितसिंह पाटील कव्हेकर




लातूर -
देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार हे तर देशाच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहतात. परंतु त्याचबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाने आपआपल्या परीने भारत देश आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक दृष्टीने समृध्द, सशक्‍त आणि बलशाली करण्यासाठी आणि बलशाली भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्ताने स्वामी विवेकांनद विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित ध्वजारोहन समारंभात बोलत होते. यावेळी जेएसपीएम संस्थेचे शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, संचालक बापूसाहेब गोरे, संचालक विनोद जाधव, प्रशासकीय अधिकारी प्रमोद लोलगे, मुख्य अकाऊंटंट युवराज उफाडे, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य संदिप पांचाळ, प्राचार्य शिरीन मॅडम, प्राचार्य डॉ. शैलेश कचरे, उपप्राचार्य सुनिल मुचवाड, उपप्राचार्य संजय अंकुश, उपप्राचार्य एजाज शेख, मुख्याध्यापक संजय बिराजदार, उपमुख्याध्यापक व्यंकट कांबळे, उपमुख्याध्यापक तुकाराम यलाले आदी मान्यवर उपस्थित होते.
        कार्यक्रमाच्या प्रारंभी जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या वर्क्‍तृत्व, वाद-विवाद, चित्रकला, देशभक्‍तीपर गितगायन, वेशभूषा, निबंध लेखन, वृक्षारोपन, वृक्षसंवर्धन, विज्ञाननिष्ठ उपक्रम, मानसिक-बौध्दिक-सामाजिक समुपदेशन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, रॅली, क्षेत्रभेटी व्याख्यानमाला, पोस्टर प्रझेंटेशन, व्हिडीओ मेकींग यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमाकांत शिंदे, अलका अंकूशे यांनी केले तर आभार मनोज गायकवाड यांनी मानले. यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

Post a Comment

أحدث أقدم