लातूर/प्रतिनिधी-लातूर परिसरातील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचलित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये बालगोपाळांसाठी दहीहंडी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या शिक्षिका रुपाली कोकाटे यांनी मुलांना दही हंडी याविषयी माहिती दिली. तसेच माखनचोर कृष्णाची व त्याच्या विविध लिलांची माहिती दिली.यावेळी श्रीकृष्ण लाटे, शाळेच्या प्राचार्या दुर्गा भताने व समन्वयक रौफ शेख यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यानी दही हंडीच्या प्रसंगी गोविंदा आला रे .... गो गो गोविंदा...... मच गया शोर सारी नगरी रे...... या गाण्यावर नृत्य केले. या गीतांवर शाळेचे सर्व विद्यार्थ्यानी ठेका धरला.दहीहंडीच्या कार्यक्रमात कृष्णाची समर्थ नागरगोजे, भावेश उड्गे, श्रेयस देवकते, आर्यन वाघमारे, अनिरुद्ध क्षीरसागर, नैतिक वाघमारे, आदित्य आकनगिरे, वेंकटेश केंद्रे, ऋग्वेद जाधव, दीपराजसिंग सुर्यबंशी, प्रज्वल माळी, पार्थ कोड्गीरे, सोहम मोटे, वेशभूषा यांनी साकारली तर राधाच्या भूमिकेत आस्था बच्चेवार, स्वरा सोळंके, स्वरूपा माळी, वैष्णवी बरुरे, रसिका सूर्यवंशी या विद्यार्थिनी होत्या. शाळेतील विद्यार्थ्यानी आकर्षक मानवी मनोरा तयार करून सर्वेश जाधव या विद्यार्थाने दहीहंडी फोडली. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सोनाली शहाणे यांनी केले. शाळेच्या वतीने सर्व मुलांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या व सर्व विद्यार्थ्यानी गोपाळकाल्याचा आस्वाद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा