बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे – राज्यपाल कोश्यारी

                बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे – राज्यपाल कोश्यारी

मुंबई-प्रत्येक व्यवसाय व व्यापाराची उभारणी नैतिकता व सचोटीच्या पायावर असावी. बांधकाम व्यवसायिकांनी नैतिकता व चारित्र्य जपले तर ती देशाची आणि ईश्वराचीदेखील सेवा ठरेल, असे सांगताना बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.बांधकाम क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक व वास्तुरचनाकार यांना देण्यात येणारे 17वे  कन्स्ट्रक्शन वर्ल्ड आर्किटेक्ट व बिल्डर पुरस्कार  राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.एसाप (ASAPP)  ग्लोबल इन्फो ग्रुप या माध्यम समूहाच्या वतीने राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पुरस्कार निवडक वास्तुरचनाकार व बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले.देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रनिर्माण करण्यावर सातत्याने भर दिला आहे. या कार्यात प्रत्येकाने योगदान देणे अपेक्षित आहे. बांधकाम व्यवसायात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलांचा अंगीकार करुन बांधकाम व्यावसायिकांनी सर्वोत्तम कार्याची कास धारावी, असे राज्यपालांनी सांगितले.कार्यक्रमाला फर्स्ट कन्स्ट्रक्शन कौन्सिल व कंस्ट्रक्शन वर्ल्डचे संस्थापक प्रताप पदोडे व सह-संस्थापिका फाल्गुनी पदोडे प्रामुख्याने उपस्थित होते.राज्यपालांच्या हस्ते वास्तुरचनाकार आभा नारायण लांबा असोसिएट्स, सी पी कुकरेजा, डीएसपी डिझाईन, एडिफीस कन्सल्टंट्स, पी जी पत्की व संजय पुरी आर्किटेक्टस यांना तसेच सर्वोत्कृष्ट बिल्डर पुरस्कार निरंजन हिरानंदानी. के रहेजा कॉर्प, महिंद्रा लाईफस्पेसेस, प्रेस्टिज आदींना देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने