लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत 100 झाडाचे वृक्षारोपण

लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत 100 झाडाचे वृक्षारोपण




  लातूर-श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयांमध्ये गणेश मूर्तीची स्थापना  करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य डॉ. रमाकांत घाडगे  हे प्रमुख उपस्थिती होते याच्य हस्ते गणेश मूर्तीची  आरती करण्यात आले, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत प्रमुख  पाहुण्याच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते  100 झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमचे प्रस्ताविक शिवलिंग जेवळे सरांनी केले व घाडगे सरांनी विद्यार्थ्यांना गणेश चतुर्थी निमित्त पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
        तसेच संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे,  डॉ.नितीन लोणीकर , देशमुख सर, जोशी सर आदी.तसेच राजीव गांधी पॉलिटेक्निक हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आय टी आय, ज्ञानसागर विद्यालय हासेगाव ,लातूर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयातील सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.तसेच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमचे सादरीकरण केले त्यामध्ये ग्रुप डान्स,गीत गायन आदी कार्यक्रम  केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी तवदरकर,नाजनिन शेख, नेहा ब्राह्मणे यांनी केले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने