जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग्ण शोध मोहिम -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग्ण शोध मोहिम 

-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन  

    




लातूर- जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण्‍  शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण्‍  शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण ग्रामीण व निवडक शहरी भागात आरोग्य कर्मचारी आशा व स्वयंसेवकांच्या मार्फत प्रत्येक घरात भेट दिली जाईल. संशयीत कुष्ठरुग्ण्‍  शोधण्यासाठी घरातील प्रत्येक स्त्री व पुरुष सदस्यांचे प्रत्यक्ष त्वचेची तपासणी करण्यात येणार असून क्षयरोगाविषयी संशयित तपासणी करण्यात आहे, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहन केले आहे.

जिल्हा स्तरीय समन्वय समिती 30 ऑगस्ट 2022 रोजी आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. सदर बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अभिनव गोयल, , आयुक्त महानगर पालिका अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक, लातूर, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहसंचालक, कुष्ठरोग, जिल्हा क्षयरोग अधिकारी व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्ण्‍  शोधून त्यांना उपचारासाठी आणणे, लवकरात लवकर व विना विकत्रती शोधून काढणे, त्वरीत बहुविध औषध उपचार सुरु करणे, समाजातील रोग-संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोग प्रशासनास प्रतिबंध करणे, कुष्ठरोग दुरिकरणाचे ध्येय साध्य करणे असा अभियानाचा उद्देश आहे. राज्यातील सर्व जिल्हयांच्या कार्यक्षेत्रातील सर्व घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून घरांमधील सर्व सभासदांची तपासणी करण्यात येणार आहे.

सर्वेक्षण कालावधीत एकूण ग्रामीण लोकसंख्या 2047186 व शहरी लोकसंख्या 212987 असे एकूण लोकसंख्या 2260173 निवडण्यात आलेली आहे. सर्वेक्षण कालावधी 14 दिवस असून; शनिवार रविवार सोडून दररोज एक टिमला सर्वेक्षणासाठी नेमुण दिलेल्या घरसंख्या ग्रामीण भागात 20-25 घरे व शहरी भागात 30 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरातील सर्व सभासदांचे तपासणी करण्यात येईल. घरातील सर्व महिलांची तपासणी आशांमार्फत व पुरुषांची टिममधील पुरुष स्वयंसेवकांमापर्फत कुष्ठरोग व क्षयरोगाची तपासणी करण्यात येईल.

क्षयरोगाचे लक्षणे,कुष्ठरोगाचे लक्षणे पूढील प्रमाणे आहे. दोन आठवडयाहून अधिक कालावधीचा खोकला         तेलकट, गुळगुळीत, सुजलेली व लालसर त्वचा कालांतराने जाड झालेल्या कानाच्या पाळया, विरळ झालेल्या भुवयांचे केस. दोन आठवडयाहून अधिक कालावधीचा ताप शरीरावरील त्वचेपेक्षा फिकट किंवा लालसर रंगाचा त्रास न देणारा, बृयाच कुठलाही डाग, चटटा वजनात लक्षणीय घट हाता-पायांना सुन्नपणा, बधिरता, स्पर्शज्ञान नसणे, स्नायुचा अशक्तपणा व डोळा, चेहरा, हात किंवा पायांची विकत्रती. भुक मंदावणे, मानेवर गाठी येणे.मोहिमे दरम्यान आपल्या घरी येणाऱ्या  प्रशिक्षित स्वयंसेवकाकडून तपासणी करुन घ्यावी त्यांना सहकार्य करावे.

जिल्ह्यातील सर्व जनतेने आपल्या घरी दि. 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत तपासणीसाठी  भेट देण्यात येणाऱ्या संपूर्ण सदस्यांना सहकार्य करावे. हा एक राष्ट्रीय कार्यक्रम असून तो राबविण्यासाठी देशाला कुष्ठरोग व क्षयरोग मुक्त करण्यात आपला सहभाग निश्चित ठामपणे द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. एल. एस.देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए. सी. पंडगे, व सहा.संचालक, कुष्ठरोग, डॉ.गरफडे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने