विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठः नागेश मापारी

 विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठः नागेश मापारी





     औसा -शिक्षण विभाग पंचायत समिती औसा वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे राजीव गांधी पॉलिटेक्निक, हासेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने  49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे  सावित्रीबाई फुले .पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावर शिवलिंग जेवळे , उद्घाटक नागेश मापारी- शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाटील सतीश - गटविकास अधिकारी औसा, राजेंद्र गिरी , ढमाले मधुकर , श्रीमती भंडारी आर, कापसे आर एल ,पोतदार डी बी, कालिदास गोरे उपस्थित होते.विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे ,शासनाच्या योजना शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना कळविणे यामुळे विद्यार्थी प्रयोगशील होतील असे सतीश पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरिता हा उपक्रम आहे असे छोटे छोटे प्रयोग करून जगास काहीतरी मोठे द्यावे असे प्रतिपादन राजेंद्र गिरी यांनी केले.

विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या सप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ आहे , 80 वेगवेगळ्या गटातून प्रदर्शनी आलेली आहेत, विज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले तसेच मूलभूत विज्ञानाकडे लक्ष द्यावे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करून विज्ञान स्पर्धा विषयी मार्गदर्शन करतील अशी आशा नागेश मापारी यांनी व्यक्त केली.तर विद्यार्थ्यांनी विविध शोध लावावेत. एपीजे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले यांचे कार्य आत्मसात करावे तसेच विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे या विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सफल होईल असे प्रतिपादन शिवलिंग जेवळे यांनी केले.तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती , कार्यक्रमास सुत्रसंचलन घोकके पी आर तर आभार जाधव यु यांनी मांडले, यावेळी सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, प्रा. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, मूल्यमापन विभाग, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने