नागरिकांच्या माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांनी घेतल्या भेटी
लातूर प्रतिनिधी :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निवेदनाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रमेश सूर्यवंशी, बालाप्रसाद बीदादा, सुधीर गोजमगुंडे, लक्ष्मीनारायण कचोळ्या, युनूस मोमीन, हरिश्चंद्र कांबळे, एम.के इनामदार, दिलीप हारणे, राजकुमार पवार, तुकाराम रोकडे, राजेंद्र कांबळे, भानुदास कांबळे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जीवनराव देशमुख, उपाध्यक्ष मुरलीधर मस्के, उपाध्यक्ष अकबर शेख आदी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बाभळगावचे सरपंच प्रतिनिधी सचिन मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, बंदेनवाज सय्यद सलीम सय्यद, गणपत भाडुळे गंगाधर जाधव आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा