बोरफळच्या अंगणवाडीत पालक सभा संपन्न

बोरफळच्या अंगणवाडीत पालक सभा संपन्न


औसा-तालुक्यातील बोरफळ गावातील अंगणवाडी क्र.१,२,३ येथील पालक सभा  घेण्यात आली . गावातील ज्येष्ठ नागरिक सीताबाई यादव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

 प्रगत शिक्षण संस्थेमार्फत देण्यात आलेले साहित्याचे ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते अंगणवाडीस देण्यात आले.प्रगत शिक्षण संस्थेची माहिती तसेच मुलांची उपस्थिती, मुलांचे आरोग्य, याबद्दल पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या पालक सभेसाठी सुपरवायझर थोरात मॅडम , ग्रामपंचायत सदस्य रंजना लाळगे तसेच पालक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडीच्या सर्व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने