युवासेनेचा निर्धार मेळावा औशात संपन्न

युवासेनेचा निर्धार मेळावा औशात संपन्न
औसा / औसा येथील गार्डन फंक्शन हॉल युवासेनेचा निर्धार मेळावा झाला. यावेळी मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरूण सरदेसाई होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, विभागीय सचिव अक्षय ढोबळे, विस्तारक विपुल पिंगळे, शरद कोळी, नूतन युवासेना जिल्हा प्रमुख दिनेश जावळे, जिल्हा समनव्यक दत्ता मोहळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, तालुका प्रमुख सतीश शिंदे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, बजरंग जाधव, सुरेश भुरे, संजय उजळबे, तालुका प्रमुख अविनाश रेशमे, अण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वांजरवाडे, कृष्णा पवार, महेश सगर, प्रवीण कोव्हाळे, श्रीहरी उत्के, अभिजित जाधव, वैभव मोरे, आदी उपस्थित होते.

यावेळी सरदेसाई म्हणाले की, मराठवाडा विभागामध्ये युवासेनेच्या वतीने निर्धार मेळावे घेतले जाणार आहेत. त्याची सुरूवात तुळजापूर येथून आई तुळजाभवानीचे दर्शन घेवून केली दोन महिन्यापुर्वी शिवसेना पक्षात काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. ४0 आमदार पक्षाला सोडून गेले. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात गोवा, गुजरात आसाम येथे हे आमदार आश्रयासाठी होते. सुरुवातीला हिंदुत्वासाठी गेलो म्हणायेचे नंतर साहेब भेटत नव्हते म्हणाले, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळू देत नव्हती म्हणू लागले, महाराष्ट्राच्या जनतेला फुटीरांची कारणे पटलेली नाहीत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना फेसबुकवरील कंमेंट बॉक्स बंद करावा लागला यांच्यात हिम्मत नाही. भाजपाने रचलेले षड्यंत्र आहे हे शिवसैनिकांची समजूनघेण्याची गरज आहे. सर्व संकटात उद्धव ठाकरे यांनी चांगला कारभार करून राज्याला सांभाळते. कोरोना महामारीत १२ कोटी जनतेला धीर दिला. सगळ्या सर्व्हेत ते टॉप ३ मुख्यमंत्र्यात होते. दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत असल्यामुळेच भाजपाने शिवसेना फोडण्याचे षढयंत्र रचले. 

आता मुंबई महानगरपालिकेवरील शिवसेनेची सत्ता काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील मराठी माणूस कदापी हे शक्य होवू देणार नाही, असे सरदेसाई म्हणाले.
शिवसेनेचे ४० आमदार गद्दारी करून फुटून गेले. सत्ता जाणार आहे. हे माहित असतानाही आमिषाला बळी न पडता आम्ही एकनिष्ठ राहीलो. पानटपरी चालविणा-याला, वडापाव चालविणान्याला , ऑटोरिक्षा वाल्याला शिवसेनेने आमदार, खासदार केले हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनेमुळेच आमची ओळख आहे. त्यामुळे कदापीही आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार नाही, असे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी मेळाव्यात सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने