श्री गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहरातील रस्त्यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती
लातूर (प्रतिनिधी) :पावसाळ्यामुळे खराब झालेले लातूर शहरातील रस्ते श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्त करावेत असे निर्देश माजी मंत्री आ. आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर रस्ते दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी की जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे लातूर शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यात शुक्रवारी शहरातून श्रीगणेश विसर्जनाच्या मिरवणुकी निघणार आहेत. माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख देशमुख यांनी श्रीगणेशोत्सव काळात श्री गणेशाच्या पूजा व आरतीच्या निमित्ताने शहराच्या विविध भागात भेटी दिल्या आहेत.
या भेटीदरम्यान शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून ते खराब झाले आहेत यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, हे त्यांच्या निदर्शनास आले होते. शहरातील नागरिकांनीही यावेळी आ. अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आ. अमित देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांना शहरातील रस्ते दुरुस्तीची मोहीम तातडीने हाती घेण्याची सूचना केली आहे, पावसाळ्याच्या दिवसात मुरूम भरून तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, तसेच पावसाळा संपताच शहरातील सर्व रस्त्यांचा आढावा घेऊन ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त करण्याचे निर्देशित त्यांनी दिले आहेत,
आ. देशमुख व आयुक्त मित्तल यांच्या सूचनेनंतर लातूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात येत आहेत, रस्त्यावरील खड्ड्यामुळे श्रीविसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा