मेथी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडीची “हॅट्रिक”


मेथी ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडीची “हॅट्रिक”


ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय :बिनविरोध निवडीने मिळणार विकासाला गती


लातूर -अहमदपूर तालुक्यातील मेथी येथील ग्रामपंचायत निवडणूक गेल्या पंधरा वर्षापासून बिनविरोध होत आहे. गेल्या दोन टर्ममध्ये एस.सी.संवर्गातील हणमंत तपघाले यांना तर ओबीसी संवर्गातील संतोष सुडे यांना एक टर्म अशा एकूण दहा वर्षामध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीची परंपरा सुरु आहे. हीच परंपरा कायम ठेवत 2022-23 ते 2027-28 या पंचवार्षिक निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील सौ.लता धनराज कोडगिरे पाटील यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करून त्यांना गावच्या विकासात योगदान देण्याची संधी ग्रामस्थांनी एकमताने निर्माण करून दिलेली आहे. त्यामुळे मेथी या छोट्या गावाचा आदर्श इतर ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
मेथी ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या तीन टर्मपैकी पाच वर्षाच्या एक टर्मसाठी एस.सी.संवर्गातील हणमंत तपघाले यांना संधी देण्यात आली. त्यानंतर पाच वर्षासाठी संतोष सुडे यांना सरपंच पदी काम करण्याची संधी देण्यात आली तर सन 2022-23 ते 2027-28 या पंचवार्षीक निवडणुकीतही बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवत ओपन, ओबीसी., एस.सी.,एन.टी यासह सर्व समाजातील गावकरी मंडळींनी एकमताने व उत्साहाने तिसर्‍या टर्मसाठी खुल्या संवर्गातील सौ.लता धनराज कोडगिरे पाटील यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करून मेथी गावच्या विकासाची संधी त्यांना दिलेली आहे तर त्यांच्या साथीला सदस्य म्हणून शोभा कालिदास सुडे, कौशाबाई वामन तपघाले, उज्ज्वला पांडुरंग ठाकरे, गंगाधर शिंदे, शेख बेबीफातीमा रफिक, आश्‍विनी वसंत चोपडे, ज्ञानोबा तपघाले यांची निवड करण्यात आली आहे. तब्बल तिसर्‍यांदा झालेल्या बिनविरोध निवडीमुळे गावातील चौफेर विकासाला गती मिळणार असल्याचा विश्‍वास उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्‍त केला.
त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल बाबूराव जाधव, संजय सुडे, बाबूराव वाडकर, शिवराज माने, सूर्यकांत खोंडे, भिमराव जाधव, रमेश खोंडे, दिलीप ठाकरे, बलभीम जाधव, विजय तपघाले, दिगंबर जाधव, अविनाश जाधव, सचिन सुडे, राम हंगरगे, संतोष इरलापल्‍ले, रूपेश जाधव, धनराज कोडगिरे, सूर्यकांत तपघाले, बाळू भालेराव, मधुकर तपघाले, पुंडलिक खोंडे यांच्यासह ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे कौतुक करून त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  ्

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने