राजकीय क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्राशीही कव्हेकरांचे नाते कायम आहे- भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे


राजकीय क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्राशीही कव्हेकरांचे नाते कायम आहे- भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे  
लातूर - राजकीय क्षेत्रामध्ये कव्हेकर परिवारांचे नाव आहे हे गेल्या अनेक वर्षापासून ऐकून होते. परंतु सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातही कव्हेकर परिवारांचे नाते कायम असल्याचे आज दिसून आलेले आहे. त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रातून त्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी प्रेरणा मिळले. असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे पाटील यांनी केले.
यावेळी त्या युवा नेते अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कातपूर रोड भागातील पिनाटे नगर परिसरातील पार्वती मंगल कार्यालयात आयोजित कीर्तनात बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जेएसपीएमच्या सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर, प्रमोदिनीताई पाटील कव्हेकर,  जेएसपीएमचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, एमएनएस बँकेचे संचालक सूर्यकांतराव शेळके, सुभाषअप्पा सुलगुडले, बालाजी शेळके, जाफर पटेल, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, विश्‍वजीतसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमच्या संचालिका आदितीताई अजितसिंह पाटील कव्हेकर,  समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक संभाजीराव पाटील, विनोद जाधव, आप्पासाहेब पाटील, अशोक पाटील, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना शितलताई साबळे म्हणाल्या की, सामाजिक जीवनामध्ये काम करीत असताना तुमच्याकडे किती पैसे आहेत याला महत्त्व नाही, याच्यापेक्षा कुठल्या कामावर खर्च करता, समाजकार्यावर किती करता याला महत्त्व आहे. सध्या या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचा कल डॉक्टर, इंजिनियर होण्याकडे वाढलेला आहे. हा कल परिस्थितीनुसार निर्माण होतो. परंतु सध्या मात्र डॉक्टर, इंजिनियर होण्यापेक्षा आपल्यातील माणुसकी कायम ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे संस्काराच्या शिदोरीवर आई-वडिलांचा सन्मान होईल असे काम तुम्ही करा. कव्हेकर परिवार खूप मोठा आहे. तरीही त्यांनी मुलांना संस्काराची शिदोरी दिल्यामुळे दोन्हीही मुले संस्थेच्या वाटचालीत योगदान देेतात. याच वैभवशाली घराण्याने माझा लातूरात सन्मान केला. ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. लातूरसारख्या शैक्षणिक पॅटर्न निर्माण झालेल्या शहरामध्ये माझा कार्यक्रम ठेवला, लातूरकरांनीही आपली लेक येत आहे, आपली मुलगी येत आहे,  अशी भावना ठेवली त्यामुळे दीडशे जणांनी मला फोनवरून संपर्क केला. त्यामुळे त्यांचे आणि कव्हेकर परिवारांचे प्रेम वृंध्दीगत करण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भागवताचार्य ह.भ.प.शिलताई साबळे यांचा सत्कार कव्हेकर परिवाराच्यावतीने जेएसपीएम संस्थेच्या सचिव प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी प्रतिनिधीक स्वरूपात केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अब्दूल गालीब शेख यांनी केले. यावेळी  प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मोहन खुरदळे, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य संदिप पांचाळ, प्राचार्य शैलेश कचरे, राजकुमार साखरे, प्राचार्य डॉ.सच्चिदानंद जोशी, उपप्राचार्य डॉ.आशा जोशी, मुख्याध्यापक अरूणा कांदे, मुख्याध्यापक संजय बिराजदार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

टाळ्या वाजविल्याने सर्व आजार दूर होतात
या कीर्तन संध्या कार्यक्रमामध्ये भावीक भक्‍त टाळ्या वाजविण्यासाठी कंटाळा करतात, कंजूशी करतात. कारण यांना टाळीचे महत्त्वच माहीत नाही आणि ते जाणून घेण्याचाही प्रयत्न करीत नाहीत. पंरतु आज मी त्यांचे महत्त्व या कीर्तनातून सांगणार आहे. टाळीमुळे वजन कमी करता येते. तसेच अ‍ॅक्युपंक्‍चरची प्रक्रीयाही होते, रक्‍तवाहिण्या सूरळीत होतात. त्यामुळे कीर्तनाच्या कार्यक्रमातच नाही तर सर्वच विधायक कार्यक्रमात आपण टाळ्या वाजविण्याचे काम उत्साहाने करा, टाळ्या वाजविल्याने सर्व आजार आपोआप कमी होतील असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे पाटील यांनी केले.

भारत मातेची सेवा करा, देशप्रेम वाढवा
प्रत्येक व्यक्‍तिमध्ये देशप्रेम असते. त्यातल्यात्यात मिलेट्रीमध्ये देशप्रेम वृंध्दिगत करण्याचे काम केले जाते. माझ्याही घरामध्ये माझे काका व अन्य दोघे असे तिघेजण मिलेट्रीमध्ये देशसेवेसाठी कार्यरत आहेत. पंरतु आईचे पत्र आले. ताईचा फोन आला तरीही आप्‍तस्वकीयाच्या कार्यक्रमाला वेळेवर येणे शक्‍त होत नाही. जरी आले तरी कार्यालयाकडून कधी फोन येईल ते सांगता येत नाही. फोन येताच आहे त्या परिस्थितीत देशसेवेसाठी सिमेवर रूजू व्हावे लागते. हे वास्तव आहे. परंतु त्यांचे जीवन हे देशसेवेसाठी अर्पण केलेले असते. परंतु आपणही देशाभिमान बाळगून भारत मातेची सेवा करा आणि देशप्रेम वाढवा असे भावनीक आवहनही भागवताचार्य ह.भ.प.शितलताई साबळे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने