कामगारांच्या सर्व प्रश्‍नांसाठी मी कामगारांसोबतः सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले


कामगारांच्या सर्व प्रश्‍नांसाठी मी कामगारांसोबतः सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले






लातूर-कामगार आणि कामगार संघटना शक्तीच्या जोरावर सरकारकडून कामगारांसाठी अनेक योजना मंजूर करुन घेता येवू शकतात, यावर माझा ठाव विश्‍वास असून, मी सुध्दा कामगारांचे सर्व हक्क व सर्व प्रश्‍नांसाठी कामगारांसोबत आहे,अशी ग्वाही सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी येथे दिली.
अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना लातूर जिल्हा शाखेच्यावतीने  पत्रकार भवन येथे कामगारांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी आयोजित बेैठकीला मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर हे होते. मंचावर दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.उदय गवारे हे होते.
पुढे बोलताना मंगेश झोले म्हणाले की, आज रोजी प्रशासनात अनेक अधिकारी सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेले दिसतात, तुम्हीसुध्दा तुमच्या मुलांना अधिकारी बनवा,कामगार बनवू नका, तसेच तुमच्यासाठीच्या सर्व योजनांचा तुम्ही लाभ घ्या. तुमचे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी मी बांधील आहे. मी लातूर येेथे आल्यानंतर तुमच्या हक्काच्या ,अधिकाराच्या,प्रश्‍नांच्या सोडवूणकीसाठी आपले सर्व रेकॉर्डसुध्दा अपडेट केले आहे. यापुढेही आपल्या सर्व योजना आपणास मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहीन अशीही ग्वाही त्यांनी दिली.
यापुढील काळ हा कामगारांसाठी अतिशय कठीण असल्यामुळे कामगार संघटनांनी आपली ताकद वाढवली पाहिजे. आता भीकेसाठी नाही तर आपल्या हक्कासाठी आपण जास्तीत जास्त ताकदीने लढले पाहिजे व आपले शत्रूही आपण ओळखले पाहिजे,असा सल्ला ऍड.उदय गवारे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिला.
अध्यक्षीय समारोपात राजकुमार होळीकर यांनी संघटनेने आतापर्यत केलेल्या कामाची माहिती देवून, कामगारांच्या हक्कासाठी ,अधिकारासाठी आपली संघटना सतत कार्यरत आहे. त्यामुळे सर्व कामगारांनी संघटनेत सहभागी होवून संघटनेला अधिक बळ दिले पाहिजे. जेवढी संघटना मोठी तेवढे कामगारांच्या हिताचे निर्णय घेता येतील. यावर माझा ठाम विश्‍वास असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी संघटनेच सचिव शिवाजी भंडारे, हमीद शेख, अंकुश टकळगे, कमलाकर सांगवीकर, विठ्ठल सुरते, गौतम ससाणे, ज्ञानोबा कांबळे, अंगद सोमवंशी, प्रकाश बावगे, प्रल्हाद कलवले, सूर्यकांत पांचाळ, नूतन अंगरखे,शिलाताई भोळे, शिलाताई काशीकर, विनोद गायकवाड, किशोर सगर, गोरख वाघमारे, गौसपाशा मुल्ला आदिंनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यकारिणी सदस्य सुरेश काटे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने