पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची बुद्धिजीवी संम्मेलनात माहिती

 पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची बुद्धिजीवी संम्मेलनात माहिती







         लातूर - जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनानिमित्ताने भाजपाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या संवाद कार्यालयात बुद्धिजीवी नागरिकांचे संमेलन झाले. या संम्मेलनात अनेक मान्यवरांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रभावी उत्तुंग कार्याची माहिती दिली यावेळी भाजपाचे अ‍ॅड. मुक्तेश्वर वाघदरेशिवदासजी मिटकरीप्रा.गिरिजाप्पा मुचाटेविठ्ठल बोजेसेवा पंधरवडा जिल्हा संयोजक वसंत करमुडेसहसंयोजक सुनील उटगेबुद्धिजीवी संम्मेलन संयोजक प्रा.विजय क्षीरसागरप्रा.परमेश्वर हसबे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

       राष्ट्रनेतानरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भाजपाच्या वतीने देशभर सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या संवाद कार्यालयात विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक आदी बुद्धिजीवी नागरिकांचे शुक्रवारी संमेलन झाले या संम्मेलनात गेल्या आठ वर्षात नरेंद्र मोदी  यांनी केलेल्या विविध कार्याची माहिती देण्यात आली. काँग्रेस राजवट आणि मोदीजींची राजवट यातील फरक अनेकांनी बोलून दाखविला.

        या बुद्धिजीवी संम्मेलनास सुशीलकुमार बाजपेयी, ओमप्रकाश आर्यविनायकराव डोंगरेटी.पी. बिराजदारशेखर मांडेडॉ. संतराम मुंडेअशोकराव मलवाडेओम दोरवेभगवानराव पांचाळविनोद चव्हाणहर्षवर्धन आकनगिरेगोविंदराव मुंडेहनुमंत देवकतेशिवराज फफागेरे

, श्रीमती अर्चना बोडकेयोगिनी खरेसुजाता शास्त्रीनिशा येळबकरभीमाशंकर मिटकरीसर्वोत्तम कुलकर्णीविलास आराधेश्रीराम निकमराजकुमार बोरूळकरमहादेव गजभार यांच्यासह विविध क्षेत्रात काम केलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने