मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्‍याकरिताराज्‍यव्‍यापी आधार जोडणी विशेष शिबीर


मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्‍याकरिता

राज्‍यव्‍यापी आधार जोडणी  विशेष शिबीर

 

उस्मानाबाद- मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करणे या उपक्रमांतर्गत मतदारांनी मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार  जिल्‍हयात दि.11 सप्‍टेंबर (वार-रविवार ),2022 रोजी सर्व मतदार केंद्रावर मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्‍याकरिता राज्‍यव्‍यापी आधार जोडणी  विशेष शिबीर  अयोजित करण्‍यात येणार आहे.

मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 ब मध्ये नमुना अर्ज क्र.  तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र.6 ब भारत निवडणुक आयोगाच्या आणि मुख्य निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेचमतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब व  NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेलतसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती देखील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्‍यानुषंगाने  जिल्‍हयातील मतदार यादीतील नाव असलेल्‍या मतदारांनी या शिबिरात जास्‍तीत जास्‍त  सहभाग नोंदवून मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्‍याचे  अवाहन  जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी कौस्‍तुभ दिवेगावकर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शुभांगी आंधळे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने