बौध्दिक संपदा हीच जगावर राज्य करीत आहे- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 बौध्दिक संपदा हीच जगावर राज्य करीत आहे- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर







मुंबई/लातूर-जगामध्ये अमेरिका, चीन, ब्रिटनसारख्या देशांनी बुध्दीच्या शक्‍तीवर विविध क्षेत्रामध्ये दैदिप्यमान शोध लावले. त्यातूनच ब्रिटनने भारत, अमेरिकेसहीत अनेक देशावर राज्य केले. आजही बिल गेट्स मायक्रोसॉफ्टमध्ये बौध्दिक शक्‍तीवर जगात सर्वात श्रीमंत आहे. त्याप्रमाणेच स्टिव्ह जॉब, भारतीय राममूर्ती, अदानीसारखे उद्योजक जागतिक स्तरावर आर्थिक महाशक्‍ती बनली आहे. अमेरिका, चीन, रशीया आज जगावरती प्रभूत्व मिळवून बौध्दिक संपदेच्या जोरावर संशोधन करून त्या संशोधनातून शक्‍ती व संपत्ती मिळविण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे भारताने शिक्षण, संशोधन व अध्यात्माला अधिक प्राधान्य देवून कार्य करावे असे प्रभावी विचार भाजपा नेते तथा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते आय-30 लर्निंग सेंटर मुुंंबई यांच्या हॉटेल नॉवाटेल जूहू येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द उद्योजक, सिनेअभिनेता तथा आय-30 लर्निंग सेंटरचे अध्यक्ष विवेक आंनद ओबेरॉय हे होते. तसेच फाउंडर मेंबर तथा सी.ई.ओ.आर.पी.नंदिला, जेएसपीएम शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, अराईजचे प्रा.ए.पी.एस.सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, अमेरिकेमध्ये एमआयटी, हावर्डस्, टेक्सास, कॅलिफोर्नियासारख्या काही विद्यापीठांना आम्ही भेटी देवून शिक्षणपध्दती व तेथील व्यवस्थापन समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी जात, देश कोणीही पाहत नाहीत तर गुणवत्तेवरच विद्वानाची निवड करतात. त्यामुळे कॅलिफोर्निया विद्यापीठात जगप्रसिध्द अवार्ड असणारे 55 संशोधक व प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. असा पुरावाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
कार्यक्रामाच्या प्रारंभी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना सिने अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते ट्रॉफी देवून सन्मानीत करण्यात आले. तसेच अराईज क्‍लासेसमधून 659 गुण घेवून नीटमध्ये यश मिळविलेल्या राघव दहीफळे या विद्यार्थ्याचा सत्कारही आय-30 लर्निंग सेंटरचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते विवेक ओबेरॉय यांच्याहस्ते करण्यात आला.

शिक्षण, संशोधनाच्या आर्थिक तरतूदीत वाढ करावी
अमेरिकेतील उद्योजक संशोधनासाठी मोठी गुंतवणूक करतात त्यामुळे त्यांनी केलेल्या या गुंतवणुकीतून देशाचे व त्यांचे कल्याण होते. अमेरिकेने शिक्षणावरती जीडीपीच्या 22 ट्रीलियन डॉलरपैकी 18 टक्के गुंतवणूक केलेली आहे. त्याप्रमाणे भारत व राज्यानेही आपल्या शिक्षण व संशोधनावरील आर्थिक तरतूदीमध्ये त्वरीत वाढ करावी. यामुळे देशात क्रांती घडेल. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा गोवा  राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने