दयानंद कला महाविद्यालयातील डॉ.शिवकुमार राऊतराव यांची जिल्हा समन्वयक पदी निवड

 दयानंद कला महाविद्यालयातील डॉ.शिवकुमार राऊतराव यांची जिल्हा समन्वयक पदी निवड






 
लातूर:-महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग  महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यात जिल्हा समन्वयक पदी अनेक मान्यवरांच्या निवड करण्यात आल्या आहेत.यात  करियर कट्टा या उपक्रमाअंतर्गत करिअर कट्टा लातूर जिल्हा समन्वयक पदी दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथील डॉ. शिवकुमार राऊतराव यांची  नियुक्ती करण्यात आली.ही निवड महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राकडून कारण्यात आली आहे.  करियर कट्टा उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. करिअर कट्टा उपक्रमा अंतर्गत राज्यभरात आय ए एस आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
डॉ.शिवकुमार राऊतराव यांची  करियर कट्टा जिल्हा समन्वयक पदी निवड  झाल्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष ललितभाई शहा,  रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणे, संयुक्त सचिव सुरेश जैन , कोषाध्यक्ष संजयजी बोरा यांनी शुभेच्छा दिल्या. 
 
याप्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य (क.म.) अनिलकुमार माळी, डॉ शिवाजीराव जवळगेकर, डॉ सुनील साळुंखे, डॉ प्रदीप सूर्यवंशी, डॉ.संतोष पाटील, डॉ.बालाजी घुटे ,  प्रा.विवेक झंपले  व  अधिक्षक रूपचंद कुरे व प्रशासकीय कर्मचारी उपस्थिती होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने