साहित्य सारथी कला मंचच्या अध्यक्षपदी गंगाधर डिगोळे यांची निवड

साहित्य सारथी कला मंचच्या अध्यक्षपदी गंगाधर डिगोळे यांची निवड

लातूर -  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने व १९९३ ला लातूर जिल्ह्यातील किल्लारी या भागात भूकंपात आपले प्राण गमावलेल्या  आठवण व त्यांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष कवी सुरेश धोत्रे  यांनी त्यांचे 
सहकारी मित्र कवी व गीतकार विवेकानंद बनसोडे ,आकाश बावगे व शिवशंकर बलूले या तरूणांना एकत्रित करून साहित्य सारथी कला मंच या संस्थेची स्थापना केली.नियमाप्रमाणे या सामाजिक संस्थेची फेरनिवड करण्यात आली असून आता  या संस्थेचे अध्यक्ष म्हणून गंगाधर डिगोळे सर यांची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष म्हणून मराठी चित्रपट दिग्दर्शक माननीय शादुल बौडीवाले यांची निवड झाली आहे. आदरणीय गंगाधर डिगोळे हे साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक म्हणून कार्यरत असूनमागील पंधरा वर्षापासून ते एकलव्य संस्कार केंद्र च्या माध्यमातून गरीब व होतकरू मुलांसाठी अत्यल्प दरात वस्तीगृह चालवत आहेत. सामाजिक सलोखा जपताना, त्यांचा जनमानसातील संपर्क हा फारच प्रशंसनीय आहे. यासोबतच सामाजिक  विषयाला हात घालून त्या प्रश्नांना जनतेसमोर आणण्यासाठी त्यांनी  आदिती एक्सप्रेस हे दैनिक वृत्तपत्र सुरू केले आहे.शादुल बौडीवाले हे सामाजिक विषयावर बोट ठेवून त्या विषयाला मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या नजरेत आणणारे एक बोलके आणि धडाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.अभिनव फिल्म च्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरूणांच्या कलेला बळ देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न शील राहतात.प्रहार हा एका विद्यार्थ्यांची घालमेल आणि शिक्षण घेण्यासाठी त्याला होणारा त्रास हे दर्शवणारा लघुपट मागच्या काळात प्रचंड गाजला.त्यासोबतच प्रेमाच्या वाटेवर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपले कार्य पार पाडले आहे.कार्याध्यक्ष म्हणून गणेश परळे यांची निवड करण्यात आली आहे.साने गुरुजी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असणारे गणेश परळे सर एक उपक्रमशील शिक्षक आणि उत्तम सुत्रसंचालक म्हणून ओळखले जातात.संस्थेच्या कोषाध्यक्ष पदी आकाश बावगे यांची निवड करण्यात आली आहे.तर सचिव म्हणून कवी सुरेश धोत्रे व सहसचिव पदावर कवी व गीतकार विवेकानंद बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सदस्य पदावर शिवशंकर बलूले व पत्रकार कॄष्णा पिंजरे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिका-यांचे शुभेच्छा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने