इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने निबंध स्पर्धा


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने निबंध स्पर्धा 

      लातूर/प्रतिनिधी:दि.इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियाच्या लातूर शाखेच्या वतीने निबंध व सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित निबंध स्पर्धेसाठी"Role of Guru in my life" हा विषय देण्यात आला होता.
     या स्पर्धेचे बक्षीस वितरण सीए दिगंबर साके,सीए श्रीकांत बाहेती,सीए संजय तापडिया व सीए गंगाधर बरुरे यांच्या हस्ते करण्यात आले.आयसीए आयचे प्रेसिडेंट सीए देबाशिष मित्रा व  व्हाईस प्रेसिडेंट सीए अनिकेत तलाठी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वेबिनार द्वारे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी लातूर शाखेचे अध्यक्ष द्वारकादास भुतडा, उपाध्यक्ष सीए विश्वास जाधव, सेक्रेटरी सीए राहुल धरणे, कोषाध्यक्ष सीए महेश तोष्णीवाल तसेच विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए एकनाथ धर्माधिकारी व  कमिटी मेंबर सीए निलेश बजाज यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने