उद्योजक अशोक भुतडा कुटुंबीयांचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले सांत्वन

 


उद्योजक अशोक भुतडा  कुटुंबीयांचे 

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले सांत्वन

लातूर प्रतिनिधी : 

लातूर शहरातील ज्येष्ठ उद्योजक कीर्ती उद्योग समूहाचे संस्थापक विष्णुदास भुतडा यांचे नुकतेच निधन झाले आहे, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज शनिवार दि. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील श्रीनिवास नगर येथील उद्योजक अशोक भूतडा यांच्या मथुरा निवासस्थानी भेट देऊन ज्येष्ठ उद्योजक विष्णुदास भुतडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली भुतडा कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, सतीश भुतडा, कीर्ती भुतडा, भारत भुतडा, अर्जुन भुतडा, अजित भुतडा, आनंद भुतडा, अरविंद भुतडा, अंकित भुतडा, अनिल भुतडा, हुकूमचंद कलंत्री, डॉ. लवकुमार लोया, वेदांत चांडक, नितीन कलंत्री, मनीष कलंत्री, बंकट मुंदडा, माजी नगरसेवक सचिन बंडापले, युनूस मोमीन, पंडित कावळे, रमेश सूर्यवंशी, पवन सोलंकर, अकबर माडजे बालाजी झिपरे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी भूतडा कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने