एल.एल.एम विधी परिक्षेत विशेष प्राविण्याने उतीर्ण विधीज्ञांचा सत्कार

एल.एल.एम विधी परिक्षेत विशेष प्राविण्याने उतीर्ण विधीज्ञांचा सत्कार 




 लातूर-येथील ज्येष्ठ विधीज्ञांच्या हस्ते एल.एल.एम परिक्षेत विशेष प्राविण्याने उतीर्ण झाल्याबददल अ‍ॅड.फारूकपाशा शेख 93 टक्के,अ‍ॅड.रमेश सरवदे 90 टकके गुण यांचा सत्कार करण्यात आला. हया सत्कार सोहळयाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.मधुकर कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन अ‍ॅड.लक्ष्मण शिंदे सरकारी वकील,अ‍ॅड.भारत ननवरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे अ‍ॅड.शिदे यांनी या विधीज्ञांना पुढील काळात वकिली क्षेत्रात धडाडीने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.अ‍ॅड.ननवरे यांनी आयुष्यामध्ये टॉपर साठी विशेष संधी असते जीवनात यशस्वी होण्यासाठी टॉप होणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले. अ‍ॅड.गायत्री नल्ले यांनी उतीर्ण झालेल्या विधीज्ञांनी स्त्रियांच्या प्रश्‍नात विशेष लक्ष घालुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावे असे सांगितले.अध्यक्षीय समारोपात अ‍ॅड.कांबळे यांनी कायदयाचे  ज्ञान संपादन करून त्याचा उपयोग सर्वसामान्य व वंचित घटकापर्यत करून न्यायदानाच्या क्षेत्रात भरीव कार्य करावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अ‍ॅड.उदय दाभाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अ‍ॅड.बालाजी सिंगापुरे यांनी केले. या सत्कार सोहळयास अ‍ॅड.एस.पी.लामतुरे, अ‍ॅड.होमकर डी बी, अ‍ॅड.सदाशिव मारडकर,अ‍ॅड.राम गजधने,अ‍ॅड.विकास ढगे,अ‍ॅड.शहाबुददीन शेख,अ‍ॅड.विजयकुमार जाधव,अ‍ॅड.बालाजी राजमाले आदी विधीज्ञ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने