अभाविप विवेकानंद संस्कार संस्थेच्या अध्यक्षपदी अॅड संजय पांडे, कार्यवाह पदी प्रदीप नणंदकर


अभाविप विवेकानंद संस्कार संस्थेच्या अध्यक्षपदी अॅड संजय पांडे, कार्यवाह पदी प्रदीप नणंदकर



लातूर (वार्ताहर)-अभाविप विवेकानंद संस्कार संस्थेच्या अध्यक्षपदी अॅड संजय पांडे यांची तर कार्यवाह पदी प्रदीप नणंदकर यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ.गोपिकिशन भराडीया अध्यक्ष व प्रकाश पाठक कार्यवाह हे गेले ४६वर्षे संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत होते.१०सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष पदी डॉ.राजेश पाटील तर कोषाध्यक्ष पदी संजय प्र.अयाचित यांची निवड करण्यात आली.
प्रकाश लातूरचे, किशोर पवार,प्रा.शैलजा हसबे यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
अॅड संजय पांडे यांनी डॉ.गोपिकिशन भराडीया व प्रकाश पाठक यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Post a Comment

أحدث أقدم