लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या परवानाधारक,विनापरवानाधारक हातगाडीवाल्यावर तात्काळ कार्यवाही करा-लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्या

 लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या परवानाधारक,विनापरवानाधारक हातगाडीवाल्यावर तात्काळ कार्यवाही करा-लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्या


लातूर -परवानाधारक व विनापरवानाधारक हातगाडीवाल्यामुळे शहरातील वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. परवानाधारक हातगाडीवाल्यांना नियोजित जागा दिली असतानाही ते इतरत्र हातगाडी लावत आहेत. त्यातच विनापरवानाधारक हातगाडीवाल्याची भर पडल्यामुळे शहरातील गंजगोलाई भागातील वाहतूकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेने लक्ष देवून विनापरवानाधारक हातगाडीवाल्यावर तात्काळ कार्यवाही करून वाहतूकीची योग्य ती सोय करावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करावे लागेल अशा मागणीचे निवेदन लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याचे अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्‍त अमन मित्तल यांना देण्यात आले.
लातूर महानगरपालिकेने शहरातील गंजगोलाई परिसरात हातगाडीवाल्यांना व्यापार करण्यासाठी जागा निश्‍चित करून दिलेली आहे. परंतु अनेक परवानाधारक हातगाडीवाले व विनापरवानाधारक हातगाडीवाले यांची गर्दी वाढल्यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूकीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच हातगाडीवाले व्यापार करीत असताना त्यांचे नागरिकांसोबतचे वर्तन असभ्यपणाचे दिसून येत आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांना त्रास होत आहे. तरी महानगरपालिकेने लक्ष देवून गंजगोलाई परिसरातील परवानाधारक हातगाडीवाल्यांना त्यांनी ठरवून दिलेल्या जागेतच व्यापार करण्याची परवानगी द्यावी. तसेच काही परवानाधारक गाडीवाले नियमांचे पालन करीत नसतील तर त्यांच्यावरही कठोर कार्यवाही करण्यात यावी. याबरोबरच विनापरवानाधारक हातगाडीवाल्यावरही कार्यवाही करावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे मनपा आयुक्‍तांना देण्यात आलेला आहे. यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्यासह अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोषसिंह ठाकूर, गजेंद्र बोकन, अ‍ॅड.पंकज देशपांडे, आकाश म्हसाने, वैभव डोंगरे,  रविशंकर लवटे, अ‍ॅड.किशोर शिंदे, गुलजिसिंह जुन्‍नी,नितीन लोखंडे, संतोष तिवारी, दूर्गेश चव्हाण, सचिन जाधव, ईश्‍वर सातपूते, महादेव पिटले, मयुरेश उपाडे, योगेश गंगणे, मंदार कुलकर्णी, पंकज शिंदे, चैतन्य फिस्के, ऋषिकेश क्षिरसागर, सय्यद आवेज,  संतोष बनसोडे, आदित्य फफागिरे  यांच्यासह लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने