तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शानदार समारोप


तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शानदार समारोप





    शिक्षण विभाग पंचायत समिती औसा व वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, हासेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 49 व्या दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप 2 सप्टेंबर रोजी झाला. यावेळी विविध गटातील विजेत्यांचा गौरव करण्यात आला यात विद्यार्थी व शिक्षणकांचा समावेश होता. समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार ,औसा विधानसभा मतदारसंघ हे उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानावर वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भिमाशंकर बावगे उपस्थित होते.यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, गटविकास अधिकारी सतिष पाटील , अनुपमा भंडारी, सुभाष जाधव, ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक कालिदास गोरे,गोविंद राठोड, उमाकांत जाधव, लिंबराज थोरमोटे ,कापसे आर एल,पोतदार डी जी, श्री बोयणे, परिक्षक पाटील सी जी,कदम जी ए,गिरी डी डी उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये माध्यमिक गटात माने विशाखा मुकिंद प्रथम-शिवाजी विद्यालय शिवनी (बू), पठाण सुमय्या गुलाब द्वितीय-ज्ञानसागर विद्यालय हासेगाव, शिंदे शुभम मधुकर - जि.प.प्रशाला लामजना तृतीय क्रमांक पटकावला तर प्राथमिक गटात गायकवाड पुनम दत्तात्रेय प्रथम- शिवाजी विद्यालय शिवणी, जाधव पल्लवी गोविंद द्वितीय-जि.प.प्रशाला करजगाव, औरादे रामेश्वर मारुती-जि.प.प्रशाला लखनगाव तृतीय क्रमांक पटकावला याशिवाय प्रयोगशाळा सहाय्यक वालचंद घारू राठोड-प्रतीभा निकेतन माध्यमिक आश्रम शाळा मनोहर तांडा , प्रथम क्रमांक पटकीला. माध्यमिक शिक्षक गटात श्रीमती अर्चना बळवंतराव शेंडे जि.प.प्रशाला भादा तर प्राथमिक शिक्षक विभागात सौ माने ए जी प्रथम-जि.प.प्रशाला धानोरा, श्री सगरे सुनील बलभीम द्वितीय-कन्या प्रशाला भादा, श्री कांबळे ए जी-जि.प.प्रशाला आनंदवाडी यांनी तृतीय क्रमांक  पटकाविला. या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आलयावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध प्रयोग पाहिले ते विद्यार्थ्यांकडून समजून घेतले. "आजचं जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जग आहे. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात साधलेल्या प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे. भावी पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देताना ते तंत्रज्ञान केवळ विधायक कामांसाठी वापरावे हे सुद्धा शिकवणे गरजेचे आहे" असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले. विज्ञान म्हणजे अंधारात केलेली दगडफेक नसते, ज्याचा शोध लावायचा आहे त्याचा व्यवहार उपयोग करावा . विद्यार्थ्यांनी युजर्स नव्हे तर क्रियेटर्स व्हावे असे प्रतिपादन शिवलिंग जेवळे यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात औसा तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती . समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके पी आर , प्रास्ताविक श्रीमती भंडारी अनुपमा तर आभार कापसे आर एल यांनी मांडले . कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता ज्ञानसागर विद्यालय, हासेगाव व जि.प.प्राशाळा,हासेगाव येथील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने