लातूर शहर व जिल्ह्यातून आलेल्या विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधीतसेच नागरिक यांची माजी मंत्री आ. अमित देशमुखबाभळगाव निवासस्थानी भेट घेतली



लातूर शहर व जिल्ह्यातून आलेल्या विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी

तसेच नागरिक यांची 

माजी मंत्री आ. अमित  देशमुख

बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली




लातूर प्रतिनिधी :

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची आज शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहर व जिल्ह्यातून आलेल्या विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरीक यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली. निवेदने स्वीकारली, त्यांच्या अडचणी समस्या सोडवण्यासंदर्भात ग्वाही दिली. तसेच भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुधीर अनवले व सुखदेव बेरड  भेट यांनी घेऊन येत्या ७ सप्टेंबर २०२२ रोजी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले, समाजाच्या मागण्या व अडचणी यावेळी मांडल्या.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव अरुण जाधव, उमाजी जाधव, कमलाकर गुजले, गणपती जमादार, बाजीराव मुसंडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

-------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने