जनसेवा मल्टीसर्विसेसचे उद्घाटन

जनसेवा  मल्टीसर्विसेसचे उद्घाटन 



 


 

लातूर प्रतिनिधी : 


राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते  लातूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील इकबाल चौक येथील काँग्रेसचे बूथ प्रमुख मूनवर शेख व ईरफान शेख यांच्या जनसेवा मल्टीसर्विसेस (सीएससी) सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, फारुक शेख, माजी नगरसेवक सचिन बंडापले, युनूस मोमीन, राम चलवाड, महेश काळे, सुपर्ण जगताप, सुमित खंडागळे, विजय टाकेकर, किरण बनसोडे, राजक्षिरसागर, मनउद्दीन शेख, अंगद गायकवाड, विष्णुदास धायगुडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व बूथ प्रमुख परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, बूथ प्रमुख मूनवर शेख अनेक वर्ष आमच्या समवेत बालपणापासून ते लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. सामान्य कुटुंबाचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत आमच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत मूनवर शेख सारखे कार्यकर्ते तो गैरसमज दूर करतात. लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूरला आपले कुटुंब मानले तीच परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत, लातूर बद्दल आमच्या मनात कुठलीही तडजोड राहत नाही लातूर हे आपलं आहे लातूर तुमच व माझ आहे, या भावनेमुळे लातूरची प्रगती झाली आहे. लातूर हे आपलं घर आहे असे प्रत्येकाला वाटते लातूरची प्रगती लातूरच्या संस्कृतीमुळे होत आहे असे त्यांनी सांगितले. लातूरमध्ये लाखभर विद्यार्थी बाहेरचे शिकण्यासाठी आलेले आहेत, स्वर्गीय दगडोजीराव देशमुख यांनी लोकनेते विलासराव देशमुख व सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना पुण्याला शिक्षणासाठी पाठवले, आता मुंबई पुण्याचे लोक शिक्षणासाठी लातूरला येत आहेत, हे सर्व आपण जपले पाहिजे. भारत महाराष्ट्रातून लातूरला शिक्षणासाठी विद्यार्थी येतात तर लातूरचे विद्यार्थी लंडन न्यूयॉर्कला शिक्षणासाठी गेले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, या जनसुविधा केंद्राचा उपयोग सर्वसामान्यांच्या दारापर्यंत विविध योजना घेऊन जाण्यासाठी होणार आहे, दहा हजार लोकसंख्येमागे एक जण सुविधा केंद्र करावे असे मी सुचित करतो, रमाई घरकुल योजनेचा हप्ता अडकला आहे तो का अडकला याची माहिती जनसुविधा केंद्रामुळे नागरिकांना मिळेल. सदया सिद्धेश्वरच्या ओढ्याचे सुसोभीकरण चालू आहे, एसओएस समोरील गार्डनच्या विकासला आपण मंजूर दिलेली आहे, तेथे लायब्ररी व रिडींग रूम करणार आहोत, लहान कुटुंबातील मुलांची तेथे सोय होईल, मराठवाड्यात आतापर्यंत नसलेली अशी अत्याधुनिक रीडिंग रूम तेथे बनवणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शिकवणीनुसार आपण काम करत आहोत. या प्रभागात कोट्यावधीची कामे सुरू आहेत, रस्ता व नालीची कामे दर्जेदार करावीत अत्यावश्यक राहिलेल्या कामाचा प्रस्ताव महानगरपालिकेने तयार करावा, नव्याने आराखडा विकास कामाचा तयार करावा, अशा सूचना यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केल्या. शहराच्या विकासासाठी चांगली माणसे पुढे आली पाहिजेत, जनतेला जे मंजूर ते आम्हाला मंजूर आहे. लातूर शहराच्या विकासाची एक नवी पहाट उजडणार आहे, असे सांगून त्यांनी सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा मल्टी सर्विसेसचे संचालक मूनवर शेख यांनी केले तर माजी नगरसेवक सचिन बंडापले यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रभाग क्रमांक २ मध्ये सुरू असलेली कामे व भविष्यात करण्यात येणाऱ्या कामाची सविस्तर माहिती दिली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान कांबळे यांनी केले.


प्रभाग क्रमांक २ मधील इकबाल चौक येथील काँग्रेस कार्यकर्ते तुकाराम गंगथडे यांच्या घरी गौरीपूजन निमित्त आमदार अमित देशमुख यांनी भेट देऊन त्यांच्या घरातील गौरीचे पूजन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या, तसेच लातूरचे नागरी संतोष बालगीर यांनी भारतभरात १० हजार किलोमीटर सायकल चालवली आहे, त्याबद्दल त्यांचे आमदार अमित देशमुख यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने