राजमाता जिजामाता महाविद्यालयाचे१३ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र




राजमाता जिजामाता महाविद्यालयाचे
१३ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र

लातूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने घेण्यात आलेल्या सन २०२२ च्या ‘नीट' परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयातील १३ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले असून या महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयातील आदित्य प्रदीप बचाटे याने ६११ गुण, स्वाती संजीव गिरी याने ५६७, प्रसन्नकुमार राजकुमार जाधव याने ५३७, विठ्ठल साहेबराव कोळेकर याने ४९८, अनिकेत विश्वनाथ रोकडे याने ४६७ गुण मिळविले आहेत तर या परीक्षेत कार्तिक राजन पांचाळ, वैष्णवी रणजीत हाके, सूरज बालासाहेब चाटे, सिद्धी सुरेंद्र कटके, प्रथमकुमार गणेशलाल सिकवाल, तुषार भालचंद्र गड्डीमे, ओम नितीन सूर्यवंशी, सप्तशृंगी गुंडप्पा कडोळे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश मिळविले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या अधीष्ठाता वैजयंता पाटील, संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, प्रा. कविता केंद्रे, समन्वयक स्वाती केंद्रे, प्रा. अश्विनी केंद्रे, प्रा. वैशाली केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, प्रा. बी. बी. खटके, प्रा. एस. आर. धुमाळ, प्रा. ए. एस. खोत, प्रा. एस. एम. जाधव, प्रा. डी. ए. फंड, प्रा. वैशाली पाटील आदींनी कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم