टिपराळ येथे लिंगायत समाज मेळाव्याचे आयोजन

टीपराळ  येथे लिंगायत समाज मेळाव्याचे आयोजन



लातूर ः लिंगायत महासंघ शाखा लातूर जिल्हा लातूरच्यावतीने टिपराळ ता.शिरूर अनंतपाळ येथे लिंगायत समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते होणार असल्याचे लिंगायत महासंघाकडून सांगण्यात आले आहे.
शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील अनेक गावातील समाजबांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असुन यावेळी समाजातील प्रश्‍नावर व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच लिंगायत महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकार्‍यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे, उपाध्यक्ष तानाजी पाटील भडीकर, उपाध्यक्ष करीबसवेश्‍वर पाटील, उपाध्यक्ष गणेश पटणे, उपाध्यक्ष तानाजी सोनटक्के, प्रा.पंडीत देवशेट्टे, माणिकप्पा मरळे, शिवदास लोहारे, तानाजी डोके, सुर्यकांत मळगे, आत्माराम हिंडे, रमेश वेरूळे, संगय्या स्वामी, शरण पाटील कवठेकर, तुकाराम कावळे, योगीराज स्वामी, मार्गदर्शक सिद्रामप्पा पोपडे, विश्‍वनाथ मिटकरी, गोरोबा काका शिवणे, विश्‍वनाथ सताळकर, विश्‍वनाथ सावळे, बलराज खंडोमलके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष तसेच शहराध्यक्ष आणि विविध गावाच्या शाखेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील सर्व समाजबांधवानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन लिंगायत महासंघाचे लातूर शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم