कृषी संशोधन केंद्र रेपोली माणगाव येथे ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक संपन्न

कृषी संशोधन केंद्र रेपोली माणगाव येथे ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक संपन्न







       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड )- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा माणगाव आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे संयुक्त विद्यमाने कृषि संशोधन केंद्र रेपोली ता.माणगाव येथे कोकण विभागातील पाहिली ड्रोन द्वारे फवारणी चे प्रात्यक्षिकं प्रक्षेत्रावर घेण्यात आले. 
      यावेळी विभागीय कृषि सह संचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सौ. उज्वला बाणखेले मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी बायर क्रॉप सायन्स कंपनीचे प्रमुख सुशील देसाई,खांबेटे व सर्व टीम यांनी ड्रोनद्वारे फवारणी कशी करावयाची याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानचा अवलंब करून तयार केलेले ड्रोनद्वारे फवारणी कशी फायदेशीर आहे तसेच मजुरांवर अवलंबून न राहता ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय वापरावा असे सांगीतले. यावेळी डॉ. नरेंगलकर,  किटकशास्र विभाग दापोली यांनी कीटकनाशक फवारणी करताना काय काळजी घ्यावी याबदल मार्गदर्शन केले. ड्रोन द्वारे फवारणी करताना ५-७ मिनिटा मध्ये एक एकर प्रक्षेत्रावर फवारणी करण्यात आली. यावेळी डॉ.जळगावकर किटकशास्र विभाग कर्जत, शिवराम भगत सहयोगी संशोधन संचालक कर्जत यांनी उपस्थीत राहून शेतकऱ्यानं मार्गदर्शन केले. 
       यावेळी आनंद कांबळे उपविभागीय कृषी अधिकारी माणगाव, डॉ. दडेमाल,  आर. डी.पवार तालुका कृषि अधिकारी माणगाव तसेच तालुक्यांतील  ८५ प्रगतशील शेतकरी, कलिंगड, कारली व भाजीपाला उत्पादक शेतकरी , तसेच महाड पाळी, तळा, रोहा येथील कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने