हासेगाव श्री वेताळेश्वर शिक्षण संकुलात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

 हासेगाव  श्री वेताळेश्वर शिक्षण संकुलात  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन  साजरा 







       

  औसा (प्रतिनिधी) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेत महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजना द्वारा ७४ वा  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि  २८ वा विद्यापीठ वर्धापनदिनाचे औचित्या साधून संस्थेचे   अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे  यांच्या हस्ते ध्वजारोहण     करण्यात आला . या प्रसंगी  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजनकरण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे  ,सचिव वेताळेश्वर बावगे  संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्यदापक कालिदास गोरे, प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ),डॉ  मेश्राम वीरेंद्र,हासेगाव चे सरपंच सौ शालूबाई राठोड , सोसायटीचे वाईस चेरमन संगमेश्वर बाबुअप्पा बावगे , ग्रामपंचायत सदस्य वर्षा राठोड ,  इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.

                  या वेळी  लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने