स्वामी विवेकानंद विद्यालयात डॉ.सर्वपल्‍ली राधाकृष्णनयांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी


स्वामी विवेकानंद विद्यालयात डॉ.सर्वपल्‍ली राधाकृष्णन
यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी

लातूर-जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय एमआयडीसी कळंब रोड लातूर येथे डॉ.सर्वपल्‍ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापक संजय बिराजदार, उपप्राचार्य संजय अंकूश, उप्राचार्य सुनिल मुचवाड, मुख्याध्यापक व्यंकट कांबळे, उपमुख्याध्यापक तुकाराम येलाले, बालाजी बोकडे, मोमले, बादाडे, भोसले, जाधव, सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य गोविंद शिंदे यांच्याहस्ते डॉ.सर्वपल्‍ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने