हसलगण जिपशाळेच्या विद्यार्थीनी शिष्यवृत्ती पात्र



 हसलगण जिपशाळेच्या विद्यार्थीनी  शिष्यवृत्ती पात्र





 औसा/प्रतिनिधी: जून महिन्यात घेण्यात आलेल्या NMMS या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हसलगण शाळेतील2 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. शाळेतील एकूण 10 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 2 विद्यार्थी  शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
        राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS परीक्षा) ही महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते.या परीक्षेत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हसलगण च्या कु. मोरे सिद्धी महादेव, कु. पवार आदिती महादेव  या विद्यार्थ्यीनींनी यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे व संपूर्ण शाळेच्या टीमचे या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्रीमती अनुपमा भंडारी मॅडम, विस्तार अधिकारी गोविंद राठोड , मातोळा केंद्राचे केंद्रप्रमुख उमाकांत जाधव , केंद्रप्रमुख शारवाले सर, केंद्रीय मुख्याध्यापक दिलीप मोरे सर, केंद्रातील सर्व घटक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, हसलगण गावचे प्रथम नागरिक तथा ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, सर्व ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती सभापती व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे व  शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन केले आहे.

1 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم