युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे साजरा

                 युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा

            वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे साजरा  

पाच शाळांना दोन हजार ग्रथांची भेट, 300 रूग्ण व नातेवाईकांना अन्‍नसेवा तर 15 
रिक्षाच्या माध्यमातून अपंग व वृध्दांना मोफत प्रवासी सेवा

लातूर-दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी 8.30 वा. गौरीशंकर मंदिरात महाअभिषेक, शेखमियाँ साहेब दर्गा,कव्हा येथे चादर चढविणे, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पाच शाळांना दोन हजार ग्रंथांचे वाटप, तीनशे रूग्ण व नातेवाईकांना अन्‍नसेवा याबरोबरच शहरातील अपंग व वृध्दांना दिवसभर 15 रिक्षाच्या माध्यमातून मोफत प्रवासी सेवा आदी उपक्रम राबवून असे एक नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमाने युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यामध्ये गुरूवारी सकाळी 8.30 वा मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरामध्ये युवा  नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त  जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांच्याहस्ते महाअभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिर मंदिर कमिटी व्यवस्थापक राजकुमार शेटे, पुजारी सोमनाथ स्वामी, गणेश शेटे आदींची उपस्थिती होती.
कव्हा येथे भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार यांच्याहस्ते शेखमियाँ दर्गा येथे चादर चढविण्यात आली. यावेळी अशोक पाटील, नेताजी मस्के, दीपमाला मस्के, प्रमोद मोकाशे, थंबा सर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. तसेच येथील शासकीय सर्वेपचार रूग्णालय परिसरात रूग्ण व नातेवाईकांसाठी अन्नसेवेचा कार्यक्रम प्राचार्य गोविंद शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा.मारूती सुर्यवंशी, प्राचार्य मनोज गायकवाड, शैलेश कचरे, संदीप पांचाळ, कमलाकर कदम, विनायक टेकाळे, आदी उपस्थित होते. गुरूवारी सकाळी कुटुंबियातर्फे अजितसिंह पाटील कव्हेकर यांचे अभिष्ठचिंतन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, सौ.आदितीताई पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, विश्‍वजीत पाटील कव्हेकर, अनिताताई कदम, अशोक पाटील, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, जेएसपीएमचे समन्वयक संभाजीराव पाटील आदींची उपस्थिती होती.
युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अपंग व ज्येष्ठ नागरिकांनी पंधरा अ‍ॅटोच्या माध्यमातून मोफत प्रवासी सेवा देण्यात आली. यावेळी रंणजितसिंह पाटील कव्हेकर, भाजयुमोचे गजेंद्र बोकन,  सोमनाथ वाघमारे, अलीशर शेख, संतोष तिवारी, बाळू शिंदे, माधव गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा.मारूती सूर्यवंशी यांच्या पुढाकरातून पाच शाळांना दोन हजार ग्रंथाची भेट देण्यात आली.  त्यानंतर भाजपा नेते तथा माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भारतीय जनता पार्टीचे शहरचे संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, ज्योतीराम चिवडे, पत्रकार रामेश्‍वर बद्दर, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जेएसपीएमचे समन्वयक बापूसाहेब गोरे, विनोद जाधव, एम.एन.एस.बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, मुख्याध्यापक अप्पासाहेब पाटील, जनरल मॅनेजर गहिरवार, जेएसपीएमचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद लोळगे, पत्रकार संगम कोटलवार, प्राचार्य सच्चिदानंद जोशी, उपप्राचार्य आशा जोशी, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, प्राचार्य राजकुमार साखरे, जाजू शेठ, प्राचार्य मोहन खुरदळे, डॉ.आश्‍विन खुरदळे, मुख्याध्यापक संजय बिराजदार, गणेश कदम, अमरदीप जाधव, नसरीन मॅडम, रमेश फटाले, डॉ.संदीप क्षीरसागर, सिकंदरपूरचे माजी सरपंच शिवाजी देशमुख, अराईजचे राकेश मिश्रा,धीरज मिश्रा, लायक पठाण, संतोष मैहंदरगीरकर, युवराज उफाडे, ज्ञानोबा चाटे, विकास इंगळे, मुख्याध्यापिका अरूणा कांदे, शैलेंद्र शिंदे, संतोष बिराजदार, बालाजी शेळके, जाफर पटेल, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्रा.डॉ.सतीश यादव, नगरसेविका रागिणी यादव, रासपचे दादासाहेब करपे, अ‍ॅड.पंकज देशपांडे, शंभूराजे पवार, राहूल भूतडा, रवी लवटे, महादू पिटले,संजय गीर, तुळशीराम कोयले, चंद्रकांत वैरागकर, ह.भ.प.ज्ञानेश्‍वर चाटे महाराज,ओम धरणे, श्रीकांत पवार,सुरज गवळी,ऋषीकेश शिंदे, रविंद्र बेंबडे, जबेर मनियार,पांडुरंग बोडके, अ‍ॅड.पूनमताई पांचाळ, गौरव बिडवे, अजय कोटलवार, ऋषी जाधव, चैतन्य फिस्के, दीपक मठपती, अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, आकाश बजाज, काका चौगुले, वैभव डोंगरे, आकाश पिटले,  अजय गंभीरे, गौरव बिडवे, डॉ.एम.आय.शेख,डॉ.मोटे, डॉ.पठाण,अ‍ॅड. हरिकेश पांचाळ, विशाल कदम, श्रीकांत पाटील, अमर पाटील, भालचंद्र पाटील, लक्ष्मण सूर्यवंशी, रविंद्र कांबळे, गौरव बिडवे, गुलजीसिंह जुन्‍नी, धनंजय हाके, शिवदास बायस, दिगंबर शेटे, संतोष ठाकूर, राजेश पवार, आकाश जाधव,  यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांची भेट घेवून अभिष्टचिंतन केले.
माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील यांनीही केले अभिष्टचिंतन
भाजपा युवा नेते अजितसिंह शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी भेट देवून शाल पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिष्टचिंतन केले.

Post a Comment

أحدث أقدم