महात्मा बसवेश्वरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती उत्साहात संपन्न

 महात्मा बसवेश्वरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती उत्साहात संपन्न

लातूर -येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात ७४वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, २८वा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड वर्धापन दिन आणि प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.  
यावेळी सर्वप्रथम श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा.मन्मथप्पा लोखंडे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वज आणि विद्यापीठध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, कार्यालयीन प्रमुख आत्माराम वाघमारे आणि नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीत विभागाचे प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.अजय सोमासे आणि विद्यार्थिनीनी “विद्येची अन पवित्रतेची, इथे वाहते ज्ञानधारा” हे विद्यापीठ गीत सादर केले.  
यावेळी मार्गदर्शन करताना श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा.मन्मथप्पा लोखंडे म्हणाले की, आपण आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करीत आहोत. त्याच पद्धतीने आजपासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ होत आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे नेतृत्व केले होते यामध्ये देवीसिंग चव्हाण, चंद्रकांतदादा बाजपाई आणि इतर क्रांतिकारकांचा मोठा सहभाग होता. आपल्या महाविद्यालयामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे त्याबद्दल त्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला.  
या कार्यक्रमांमध्ये वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.विजयकुमार सोनी आणि प्रा.कृष्णा लोहार लिखित “जीएसटी मेड इझी” या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच हिंदी विभाग प्रमुख डॉ.  मनोहर चपळे आणि इतर सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या “स्वाधीनता आंदोलन और हिंदी काव्य” या शब्दोत्सव विशेषकाचे विमोचन सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये ऋतुजा भिसे, राणी ढोणे, मोहिनी गायकवाड आदींचा सहभाग होता. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विभागातील डॉ.यु.एस.कडगे आणि डॉ.ए.एस.रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी “मुक्ती संग्रामाचे शिल्पकार: स्वामी रामानंद तीर्थ” या भित्तीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  
यानंतर जेष्ठ प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शिवशंकरप्पा बिडवे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सचिव मा.मन्मथप्पा लोखंडे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर, ज्येष्ठ संचालक ॲड.श्रीकांतजी उटगे, संचालक अशोकप्पा उपासे, प्राचार्य, उपप्राचार्य, शाखा समन्वयक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.  
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धोंडीबा भुरे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षण विभाग, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर, ग्रंथालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

أحدث أقدم