श्री केशव बालाजी देवस्थानच्या वतीने ब्रम्होत्सवाचे आयोजन

 श्री केशव बालाजी देवस्थानच्या वतीने ब्रम्होत्सवाचे आयोजन 




लातूर : औसा येथील याकतपूर रोडवर असलेल्या श्री केशव बालाजी देवस्थानच्या वतीने नवव्या  ब्रम्होत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ब्रम्होत्सव दि. २७ सप्टेंबर ते दि. ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणार असल्याची माहिती केशव बालाजी देवस्थानचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी दिली. 
तिरुपती बालाजीचा भक्तवर्ग सगळीकडे मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक भक्ताची तिरुपती बालाजीच्या दर्शनाची इच्छा पूर्ण करता यावी, या उद्देशाने औश्याच्या  याकतपूर  रोडवर प्रति बालाजीचे भव्य दिव्य  मंदिर  वर्ष २०१४ साली उभारण्यात आले. या मंदिरातील श्री केशव बालाजीचे दर्शन घेण्यासाठी केवळ लातूर जिल्हा- महाराष्ट्रातीलच नाव हे तर शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा  प्रांतातूनही भाविकभक्त मोठ्या प्रमाणात याठिकाणी येतात . या भक्तांसाठी  देवस्थानच्या वतीने विविध सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रतिवर्षी नवरात्रीचे औचित्य साधून या मंदिरात ब्रम्होत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी ब्रम्होत्सवाचे हे नववे वर्ष आहे. दि. २७ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या या ब्रम्होत्सवात  प्रतिदिन विविध धार्मिक उत्सव संपन्न होणार आहेत. दि. २७ सप्टेंबर रोजी शेष वाहन, २८ रोजी हंस वाहन, २९ रोजी गरुड वाहन, ३० रोजी कल्पवृक्ष वाहन, दि. १ ऑक्टोबर रोजी हनुमंत वाहन, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी सूर्यप्रभा वाहन व सायंकाळी गज वाहनांवर श्रीची वरात  निघेल व त्यानंतर लक्ष्मी पद्मावतीसमवेत देवाचा विवाहसोहळा संपन्न होईल. दि. ३ ऑक्टो. रोजी चंद्रप्रभा वाहन, दि. ४ ऑक्टो. रोजी अश्व वाहन व दि. ५ ऑक्टोबर रोजी  ली श्री बालाजीचा महाअभिषेक संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी भव्य असा पालखी उत्सव सोहळा संपन्न होऊन उत्सवाची सांगता होईल. 
श्री केशव बालाजी देवस्थानच्या वतीने मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी  वर्षाचे बाराही महिने महाप्रसादाची सोय  उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ब्रम्होत्सवादरम्यानही  महाप्रसाद आणि फराळ उपलब्ध असतो. भाविकांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीच्या ब्रम्होत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ,असे आवाहन अध्यक्ष राजकुमार पल्लोड, रमण पल्लोड, सौ. शीतल पल्लोड, गोविंद इंदाणी, सौ. उषा सारडा, पवन  पल्लोड, हुकूमचंद कलंत्री, सतीश पल्लोड, राजेश पल्लोड, अजय मुंदडा, अविनाश मंत्री, डॉ. वरुण  नागोरी, सौ. श्रीया  पल्लोड, जगदीश भुतडा, राजेशकुमार मंत्री, सौ. सपना पल्लोड, डॉ. सौ. पूजा नागोरी, विजेश सोनी यांनी केले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने