लातूरमध्ये विशाल गिरी ऍक्टिंग स्कुलच्या वतीने किड्स फॅशन शो चे आयोजन

 लातूरमध्ये विशाल गिरी ऍक्टिंग स्कुलच्या वतीने 

 किड्स फॅशन शो चे आयोजन 





लातूर : लातूर शहरात येत्या रविवारी, दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी विशाल गिरी ऍक्टिंग स्कुलच्या वतीने  किड्स फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. हा शो वर्ष ५ ते ८ व वर्ष ९ ते १२ या वयोगटात होणार असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक सिने दिग्दर्शक विशाल गिरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 
लातूर शहर व परिसरातील पाल्यांच्या सुप्त गुणांना वाव  मिळवून देण्याच्या उद्देशाने दिग्दर्शक विशाल गिरी यांनी लातुरात एक वर्षांपूर्वी विशाल गिरी ऍक्टिंग स्कुल सुरु केले आहे. या स्कुलच्या माध्यमातून लातूर परिसरातील कलाकारांना प्रशिक्षण देऊन त्यांना चित्रपट सृष्टीत काम करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. काही दिवसापूर्वी विशाल गिरी यांनी लातुरात महिलांच्या फॅशन शोचेही यशस्वी आयोजन केले होते. आता लहान बालकांमधील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी सदर  किड्स फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्या बालकांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली जाणार आहे, असे विशाल गिरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
हा फॅशन शो रविवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेत औसा रोडवरील बडोदा बँकेच्या शेजारी असणाऱ्या इटिंग हाऊस  रेस्टारंट या ठिकाणी होणार आहे.  लातूर शहर ही गुणवत्तेची खाण  आहे. या खाणीत अनेकचांगले कलाकार आहेत, पण त्यांना सिनेसृष्टीत चांगल्या संधी मिळत नव्हत्या. आपण त्यासाठी प्रयत्नशील असून आतापर्यंत अनेक कलाकारांना तशा संधी मिळवून दिल्या आहेत. आपले आतापर्यंत सहा चित्रपट प्रदर्शित झाले असून आपण स्थानिक कलाकारांनाच प्राधान्याने त्यात काम करण्याची संधी दिली आहे. लहान मुलांसाठीच्या या फॅशन शोमध्ये आपल्या बालकांना सहभागी करण्यासाठी पालकांनी ९३२४७ ८२०८७ व  ७३८५९ ४७१८० या मोबाईलवर संपर्क साधावा ,असे आवाहनही विशाल गिरी यांनी केले आहे. यावेळी प्रिती  भगत , सुनंदा तुगावकर, सरोज डिग्रसे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने